शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर टीका केली तर होईल अटक...

By admin | Updated: May 1, 2017 03:20 IST

सध्याची परिस्थिती आणि सध्याच्या राजकारणावर भारत सरकार, पंतप्रधान, खासदार, मुख्यमंत्री इत्यादींवर कोणतीही पोस्ट

पुणे : सध्याची परिस्थिती आणि सध्याच्या राजकारणावर भारत सरकार, पंतप्रधान, खासदार, मुख्यमंत्री इत्यादींवर कोणतीही पोस्ट अथवा व्हिडिओ फॉरवर्ड करू नका़ पोलिसांनी नोटिफिकेशन काढले असून, त्यानुसार हे सायबर क्राइम  होईल आणि त्यावर तातडीने कारवाई केली जाईल़ कोणत्याही वॉरंटशिवाय अटक केली जाईल़ तेव्हा  राजकारणावर आणि धर्मावरील  चर्चेचा कोणताही मेसेज हा गुन्हा  होईल़ तेव्हा सर्वांनी हे गंभीरपणे  घ्यावे़ अशा प्रकारचे तद्दन बनावट  मेसेज सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर धुमाकूळ घालत आहेत़  अशा प्रकारे लोकांना भीती दाखवण्याची नवी पद्धत आणि आपल्याविरुद्ध कोणताही तक्रारीचा  सूर उमटू नये, यासाठी हे प्रकार सुरू  झाले आहेत़ याबाबत पुणे शहर पोलीस आणि सायबर क्राइममधील तज्ज्ञ वकिलांनी असे कोणतेही नोटिफिकेशन पोलिसांनी काढले नसल्याचे सांगितले आहे़ सत्ताधारी पक्षाच्या कोणत्याही निर्णयावर उलटसुलट चर्चा होते़ विरोधक त्यावर टीका करतात़ पण, अशा सर्व प्रकारच्या निर्णयावर आपल्याला काय वाटते, हे मांडण्यासाठी सध्या सर्व जण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपचा आधार घेतात़ विविध ग्रुपवर होणाऱ्या चर्चांमध्ये राजकीय गोष्टीबाबतच सर्वाधिक चर्चा असते़ त्यातून  बऱ्याचदा सरकारवर आणि त्यांच्या नेत्यांवर टीका होताना दिसते़ अशा टीकेमुळे समाजातील सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वातावरण तयार होऊ  शकते, हे लक्षात घेऊन बहुदा अशाप्रकारचे मेसेज पसरविले जात असल्याचे बोलले जात आहे़  याबाबत सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी सांगितले,  की जाणूनबुजून अशाप्रकारचे =मेसेज पसरवून लोकांमध्ये  भीती निर्माण करण्याचा प्रयत्न  केला जात आहे़ लोकांनी त्याकडे  दुर्लक्ष करावे़ (प्रतिनिधी)टीका करण्याचा सर्वांना अधिकारसर्वोच्च न्यायालयाचा एका निवाडा आहे़ त्यानुसार सरकारच्या कोणत्याही निर्णयावर मत व्यक्त करण्याचा नागरिकांना अधिकार आहे़ तसेच कोणाच्याही मताविरोधात आपले मत व्यक्त करता येते़ केवळ त्यात वैयक्तिक बदनामी होईल असे काही नसावे़ टीका करण्याचा सर्वांना अधिकार आहे़ केवळ निर्णयावर टीका केली म्हणून कोणावरही कारवाई होऊ शकत नाही़- अ‍ॅड़ गौरव जाचक, सायबर क्राइममधील तज्ज्ञ पोलिसांचे अशा प्रकारचे कोणतेही नोटिफिकेशन नाही़ कोणताही शासकीय आदेश नाही़ व्हॉट्सअ‍ॅपचा हा गैरवापर आहे़ त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये़ - दीपक साकुरे, पोलीस उपायुक्त, सायबर सेल, पुणेहे म्हणजे सरकारच्या विरोधात कोणीच काही बोलायचे नाही़ जनतेसाठी सरकार चालवताय ना़, मग टीकाही ऐकून घ्यायलाच हवी़ अशा प्रकारे आवाज दाबणे किंवा मुस्कटदाबी करणे असे होईल व देश हळूहळू हुकूमशाहीकडे जातोय की काय अशी भीती वाटते़ - अ‍ॅड़ मिलिंद पवार