पुणे : हिमालयापासून केरळच्या समुद्रापर्यंत आपला देश हा खंडप्राय देश आहे. जगातील सर्व देशातील कृषी भिन्नतेचा आविष्कार आपल्या देशात आहे. भारतातील ही शेती म्हणजे एक प्रयोगशाळाच आहे. पिकविणे ही एक निर्मिती आहे. त्यामुळे शेतकरी हा निर्मितीशील आणि पोशिंदा देखील आहे. शेतकरी जगला तर आपण जगू, हे समाजातील प्रत्येक घटकाला समजले पाहिजे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात अमृत महोत्सव गौरव समितीच्या वतीने कृषीतज्ज्ञ प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. जगताप यांच्या ‘मनातले कागदावर’ या पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी झाले. पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. राम ताकवले, आनंद कोठडिया, शेखर गायकवाड, प्रा. डॉ. पी. एन. रसाळ, अॅड. अशोक पवार, विकास देशमुख यावेळी उपस्थित होते. राम ताकवले म्हणाले, ‘शेती करणारा माणूस कोण आहे हे पाहिले जात नाही. तिथे प्रत्येकजण समान असतो. ही समानता शहरातील माणसामध्ये दिसत नाही. कृतीशी शिक्षणाचा संबंध लावायला हवा. जे शिक्षण कृतीशील असते, तेच शाश्वत असते. जे शिक्षण तुम्हाला समाज ज्ञान देते, तेच तुमच्या जीवनात उपयोगी असते.’ प्रकाश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले. हनुमंतराव मोहिते यांनी आभार मानले.
शेतकरी जगला तर आपण जगू : डॉ. सदानंद मोरे; प्रा. बळवंतराव जगताप यांचा पुण्यात सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:32 IST
शेतकरी जगला तर आपण जगू, हे समाजातील प्रत्येक घटकाला समजले पाहिजे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात ते बोलत होते.
शेतकरी जगला तर आपण जगू : डॉ. सदानंद मोरे; प्रा. बळवंतराव जगताप यांचा पुण्यात सन्मान
ठळक मुद्देकृषीतज्ज्ञ प्रा. डॉ. बळवंतराव जगताप यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त विशेष गौरवजगताप यांच्या ‘मनातले कागदावर’ या पुस्तकाचे यावेळी झाले प्रकाशन