शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

प्राण गेला तरी मागे हटणार नाही

By admin | Updated: July 28, 2014 04:42 IST

राज्यघटनेतच धनगर समाजाला हक्काचे आरक्षण दिले आहे. ‘धनगड’ आणि ‘धनगर’ हे एकच आहेत, असे राज्य सरकारने मान्य केले आहे

बारामती : राज्यघटनेतच धनगर समाजाला हक्काचे आरक्षण दिले आहे. ‘धनगड’ आणि ‘धनगर’ हे एकच आहेत, असे राज्य सरकारने मान्य केले आहे. परंतु, राज्य सरकारची भूमिका दुटप्पी आहे. आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी प्राण गेला तरी मागे हटणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे. आज तिघा उपोषणकर्त्यांची प्रकृती कमालीची खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तरुणांचा उद्रेक वाढत असताना उपोषणकर्त्यांनीच आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे वातावरण शांत झाले. धनगर आरक्षण कृती समितीच्या उद्या होणाऱ्या बैठकीत आगामी आंदोलनाची दिशा ठरणार आहे. उपोषणकर्त्यांनी मात्र कार्यकर्त्यांनी आग्रह करूनदेखील उपोषण मागे घेण्यास नकार दिला. त्यामुळे राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी सुकाणू समितीच्या (कोअर कमिटी) सदस्यांवर देखील संताप व्यक्त केला. आतापर्यंत उपोषण केलेल्यांचे उपोषण मागे घेऊन कोअर कमिटीच्या सदस्यांनी उपोषणाला बसावे, अशी प्रतिक्रिया तरुणांमध्ये उमटत होती. हजारोच्या संख्येने आलेल्या तरुणांच्या जमावाला शांत करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागत होते. अखेर उपोषणकर्त्यांनीच मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. कृती समितीचे नेते हनुमंत सूळ यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री, प्रमुख खात्यांचे मुख्य सचिव आणि अन्य अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी रात्री झालेल्या चर्चेची माहिती दिली. गेल्या ६ दिवसांपासून उपोषण आंदोलन सुरू असताना शासनाचा जबाबदार प्रतिनिधी या ठिकाणी आला नाही. सरकारची भूमिका आता फसवणुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली. तरीदेखील सरकारला जाग येत नाही. वेळकाढूपणा केला जात आहे. अगोदर झालेल्या बैठकीत २ दिवसांची मुदत मागितली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा ८ दिवसांची मुदत मागितली. एकूणच आरक्षणाच्या अंमलबजावणीवर संभ्रमावस्था निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार करीत आहेत. (प्रतिनिधी)