शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

बस बंद पडल्यास वाहकाला भुर्दंड

By admin | Updated: July 28, 2014 04:41 IST

मालकीच्या बस बंद ठेवून ठेकेदाराकडील बस रस्त्यावर उतरविण्यास पीएमपीकडून प्राधान्य दिले आहे

पुणे : मालकीच्या बस बंद ठेवून ठेकेदाराकडील बस रस्त्यावर उतरविण्यास पीएमपीकडून प्राधान्य दिले आहे. आता भाडेतत्त्वावरील बस बंद पडल्यास पीएमपीच्या वाहकाला त्याचे ड्युटीचे तास कमी करून डेपोमध्ये पाठविण्यात येणार आहे. याचप्रमाणे बसच्या खेपा रद्द झाल्यास गॅरेज सुपरवायझर, स्थानकप्रमुख तसेच स्टार्टर सेवकाला जबाबदार धरण्यात येणार असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.भाडेतत्त्वावरील बसेस गॅस भरण्याकरिता गेल्याने अनेकदा खेपा रद्द होतात. त्यामुळे प्रवाशांची वाहतुकीची गैरसोय व खात्याचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे डेपोमधील सुपरवायझरनी भाडेतत्त्वावरील दैनंदिन १० बसेसची समक्ष तपासणी करावी, असे कार्यालयीन परिपत्रक काढण्यात आले आहे. भाडेतत्त्वावर बस दिल्यानंतर पीएमपीकडून ठेकेदाराला ठराविक रक्कम दिली जाते. त्यामुळे ठेकेदाराने पीएमपीची देखभाल करणे, चालक पाठविणे यांसारखी बसबाबतची कामे करणे आवश्यक आहे. बस बंद पडल्यास ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बस बंद पडल्यास पीएमपीकडील वाहकाचे ड्युटीचे तास कमी का करणार आणि सुपरवायझरवर कारवाई का करणार, असा प्रश्न कामगारांना पडला आहे.