शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

संपर्क, जात, खर्चाची तयारी याचा होणार विचार

By admin | Updated: November 7, 2016 01:45 IST

दिवाळीनंतर आता राजकीय पक्षांकडून प्रभागातील उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विद्यमान नगरसेवकांना काही अपवाद वगळता

पुणे : दिवाळीनंतर आता राजकीय पक्षांकडून प्रभागातील उमेदवार निश्चित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून विद्यमान नगरसेवकांना काही अपवाद वगळता पुन्हा संधी दिली जाईल. ज्या ठिकाणी विद्यमान उमेदवार नसेल तिथली जागा निवडून आणण्यासाठी उमेदवारी देताना विविध गोष्टींचा विचार राजकीय पक्षांकडून केला जात आहे. त्यामध्ये इच्छुक उमेदवारांचा लोकांशी असलेला संपर्क, प्रभागातील बहुसंख्य मतदारांची जात, खर्च करण्याची तयारी, प्रभागातील विशिष्ट भाग आदी गोष्टींचा विचार करून उमेदवारी अंतिम होणार आहे.महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीअखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यत होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी दीड महिना अगोदर निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करून निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाईल. महापालिका निवडणुकीमध्ये घरोघर जाऊन प्रचार करण्यावर भर दिला जातो. मात्र यंदा प्रथमच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक पार पडणार असल्याने याकडे मिनी आमदारकीची निवडणूक म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीतील इच्छुक उमेदवारांनाही ६० ते ६५ हजार मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. यापार्श्वभूमीवर उमेदवारांना प्रचार करण्यासाठी जास्त वेळ मिळावा यासाठी उमेदवारांच्या याद्या यंदा लवकर जाहीर करण्याचे नियोजन सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नोव्हेंबरअखेर आपली पहिली यादी जाहीर केली जाईल असे स्पष्ट केले आहे.चार सदस्यीय प्रभागामध्ये उमेदवार हा बहुसंख्य लोकांच्या परिचयाचा असणे महत्त्वाचे असणार आहे. विद्यमान नगरसेवक हे गेल्या ५ वर्षांतील त्यांच्या कामामुळे नागरिकांशी जोडले गेलेले असतात. प्रभागात त्यांची ओळख निर्माण झालेली असते, त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारीच्या पहिल्या यादीमध्ये बहुतांश विद्यमान नगरसेवकांना तिकिटांचे वाटप केले जाईल.राजकीय पक्षांकडून त्यांच्या पातळीवर वेगवेगळे सर्व्हे केले जात आहेत. भाजपाने संपूर्ण प्रभागांचे सर्व्हे करून ए, बी, सी, डी अशी जागांची वर्गवारी केली. जेथून भाजपाचा उमेदवार निश्चित निवडून येईल ती जागा ए, त्या खालोखाल बी, सी, डी अशा जागा निश्चित करण्यात आल्या. त्यानुसार सी आणि डी जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या पेठांमध्ये कसा शिरकाव करता येईल यावर खल सुरू आहे. याठिकाणांहून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी उभे राहावे यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. (प्रतिनिधी)नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सर्वात पहिल्यांदा धावून जाणारा नगरसेवक असतो. त्यामुळे तो आपल्या घराजवळचा असावा अशी त्यांची मानसिकता असते. चार सदस्यीय प्रभागही खूप मोठे झाले आहेत. त्यामुळे पॅनल तयार करताना प्रभागांमधील वेगवेगळ्या भागातील उमेदवार त्यामध्ये असतील याची खबरदारी राजकीय पक्षांकडून घेतली जाणार आहे. त्या त्या भागातील उमेदवारांना तिथल्या मतदारांची मते एकगठ्ठा मिळतात. त्यांना आता स्वत:बरोबर आपल्या पक्षाच्या इतर उमेदवारांसाठीही मते घ्यावी लागतील.खर्चाबाबत द्विधा मनस्थितीनिवडणूक आयोगाने उमेदवारांना निवडणुकीसाठी खर्च करण्याची एक विशिष्ट मर्यादा आखून दिली आहे. मात्र ही मर्यादा क्वचितच एखाद्या उमेदवाराकडून पाळली जाते. चार सदस्यीय प्रभाग झाल्यामुळे साहजिकच उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चात मोठी वाढ होणार आहे. विविध भेटवस्तू वाटप, पार्ट्या यावर खर्च करताना तो संपूर्ण प्रभागात करायचा की आपापल्या भागापुरता करायचा याबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये द्विधा मनस्थिती दिसून येत आहे. चारच्या प्रभागामध्ये आपल्या एकट्यावरच खर्चाचा भार पडणार नाही ना याची चिंता विद्यमान नगरसेवकांना सतावू लागली आहे.जात फॅक्टर ठरणार महत्त्वाचाराज्यभरात विविध शहरांमधून निघालेल्या मराठा क्रांती मोर्चाने संपूर्ण वातावरण ढवळून काढले आहे. त्यापाठोपाठ ओबीसी मोर्चा, बहुजन मोर्चेही काढण्यात आले. यापार्श्वभूमीवर जातीय अस्मिता अधिक टोकदार बनल्या आहेत. त्यामुळे उमेदवारी देताना ‘जात’ फॅक्टरचा राजकीय पक्षांना खूप विचार करावा लागणार आहे. प्रभागांमधून वेगवेगळी जातीय समीकरणे मांडली जाऊ लागली आहेत.