शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

यंदा प्रथमच आदर्श मतदान केंद्र संकल्पना

By admin | Updated: January 9, 2017 03:06 IST

राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रातील तयारीपासून ते मतदारांना मतदार स्लिप वाटपाचे नियोजन केले आहे.

 पिंपरी : महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७मध्ये होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्रातील तयारीपासून ते मतदारांना मतदार स्लिप वाटपाचे नियोजन केले आहे. एका मतदान केंद्रावर ७५० ते ८०० मतदारांची संख्या असणार आहे. या वर्षीपासून मतदान केंद्रासाठी आदर्श मतदान केंद्र निवडण्यात येणार आहे. मानांकन देण्यात येणार आहे. राज्यभरातील सुमारे १० महापालिकांची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मतदारयादी फोडण्याचे काम सुरू आहे. तसेच केंद्रावरीलही नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे मतदारांची संख्या ७५० ते ८०० मतदार प्रतिकेंद्र आहे. महापालिका निवडणुकीसाठी निश्चित करण्यात येणाऱ्या मतदान केंद्राबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्रनिहाय मतदारांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. संवेदनशील व अतिसंवेदनशील केंद्रांची यादी निश्चित करून त्याबाबत योग्य ती उपाययोजना केली जाईल.मतदान केंद्राची पाहणी महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करून या मतदान केंद्रावर व्यवस्थित खोल्या, स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, वीजपुरवठा, रॅम्प, सुरक्षा भिंत आदी सुविधा असल्याबाबत खात्री करावी, अशा सूचना केल्या आहेत. त्यासाठीचे नियोजनही केले आहे. वीजपुरवठ्याबद्दल दक्षता महापालिका हद्दीत आदर्श मतदान केंद्र तयार करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवाव्यात. शक्यतो सर्व मतदान केंद्र ही आदर्श मतदान केंद्राच्या धर्तीवर तयार करावीत, निवडणुकीसाठीवापरण्यात येणारी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे तयार करून ती सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्राँग रूमची व्यवस्था करावी. मतदान व मतमोजणी दिवशी संबंधित ठिकाणी वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)मान्यतेनंतरच बिनविरोध उमेदवाराची घोषणा

 निवडणूक आचारसंहिता आणि नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेचा निवडणूक विभाग काम करीत आहेत. तसेच प्रत्यक्ष मतदान आणि मतमोजणी या वेळसचे नियोजनही निवडणूक विभाग करीत आहे. उमेदवारीअर्ज माघारी घेताना एक उमेदवार सोडून इतर सर्व उमेदवारांनी माघार घेतल्यास अशा बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवाराच्या नावाची तत्काळ घोषणा केली जाणार नाही.  संबंधित उमेदवाराने इतर उमेदवारांवर दबाव आणून त्यांना उमेदवारी मागे घेण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता असते. त्यामुळे असे प्रसंग घडल्यास निवडणूक आयोगाला तत्काळ सविस्तर अहवाल पाठविण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाने मान्यता दिल्यानंतरच संबंधित उमेदवाराला विजयी जाहीर केले जाणार आहे.