शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

आयसीटी योजना धूळ खात पडून!

By admin | Updated: January 11, 2017 02:27 IST

शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे केंद्र सरकार पुरस्कृत आयसीटी योजना धूळ खात पडली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १६ लाख विद्यार्थी संगणक

इंदापूर : शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे केंद्र सरकार पुरस्कृत आयसीटी योजना धूळ खात पडली आहे. यामुळे महाराष्ट्रातील सुमारे १६ लाख विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.सविस्तर वृत्त असे की, सन २००८-२००९ या वर्षापासून शासनाने अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये केंद्र पुरस्कृत आयसीटी योजना सुरू केली. ही योजना एनआयटी, आयएलएफएस, कोअर एज्युकेशन, बिर्ला, शुक्ला या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सुरू करून राज्यांमध्ये ८ हजार संगणक कक्ष तयार करण्यात आले. या योजनेत एका कक्षासाठी १२.५ लाख खर्च शासनाने केला. त्यामध्ये १० संगणक संच, यूपीएस, ओव्हरहेड प्रोजेक्टर आणि इतर साहित्य मोफत पुरवण्यात आले होते. एका कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती. त्यास महिन्याला किमान दहा हजार रुपयेप्रमाणे पाच वर्षांचे वेतन निश्चित करण्यात आले होते. संगणक निदेशकानी, ज्या विद्यार्थ्यास कधी संगणक माहीतसुद्धा नव्हता, त्याला संगणक साक्षर बनवले होते. दरवर्षी पाच शिक्षकांनाही प्रशिक्षण देण्यात आले होते. विद्यार्थी आयसीटीच्या तासाकडे लक्ष देऊन, विलक्षण उत्सुकतेने वाट बघत शिकलेसुद्धा. मात्र ही योजना संपून बरेच दिवस झाले. महाराष्ट्रातील अनुदानित माध्यमिक शाळेत पहिल्या टप्प्यात पाचशे, दुसऱ्या टप्प्यात अडीच हजार आणि तिसऱ्या टप्प्यात पाच हजार असे एकूण ८ हजार शिक्षक आणि संगणक कक्ष तयार करण्यात आले खरे; मात्र ही योजना संपल्याने तीन हजार शिक्षकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेक मोर्चे आंदोलने करण्यात आली. शिक्षकांना शासनाने कोणालाही बेरोजगार होऊ देणार नसल्याची आश्वासने दिली आहेत. संपूर्ण पाच वर्षांत या शिक्षकांची कंपन्यांनी खूप पिळवणूक केली. १० हजार रुपये किमान वेतन असतानाही केवळ ३ ते ५ हजारच मानधन तेही अवेळी दिले गेले. पगारवाढ दरवर्षी असूनदेखील पाच वर्षांत एकदाही दिली गेली नाही. भविष्यनिर्वाह निधी खात्यात अजून जमा नाही. पाच वर्षांत करार संपला. मात्र शाळेतील संगणक हे शिक्षकांच्या अभावामुळे धूळ खात पडून आहेत. (वार्ताहर)४महाराष्ट्रातील सुमारे १६ लाख विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहणार असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मग ही योजना नेमकी कुणासाठी हा ही एक प्रश्नच आहे. शासन या शिक्षणासारख्या गंभीर विषयावर विचार करणार तरी कधी? त्यातच मोर्चे काढणाऱ्या शिक्षकांवर नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात लाठीमार झाला. आता संगणक शिक्षकांनी करायचे तरी काय, हा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे लाखो विद्यार्थ्यांना नुकसान सोसावे लागत आहे.