शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शनसाठी अॅडव्हान्स देण्यास मी तयार : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:12 IST

पुणे : राज्य सरकारला अ‍ॅडव्हान्स पैसे देता येत नसतील, तर जो डिस्ट्रिब्युटर अ‍ॅडव्हॉन्स पैसे मागेल त्याला समाजातील दानशूर व्यक्तींकडून ...

पुणे : राज्य सरकारला अ‍ॅडव्हान्स पैसे देता येत नसतील, तर जो डिस्ट्रिब्युटर अ‍ॅडव्हॉन्स पैसे मागेल त्याला समाजातील दानशूर व्यक्तींकडून मी भीक मागून पैसे गोळा करून देतो़ पण महाराष्ट्रात रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण होणार नाही आणि रुग्णांवर योग्य वेळी उपचार होऊन ते बरे होतील याची काळजी घ्या, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे़

दरम्यान, अ‍ॅडव्हॉन्सशिवाय रेमडेसिविर मिळत नसल्याचा दावा राज्य सरकार करीत असल्यास, पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना आपण एक कोटी रुपये घेऊन अजित पवारांच्या टेबलवर ठेवा असेही सांगितले असल्याचे पाटील म्हणाले़

एस.एन.डी.टी़ महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण केंद्राचे (कोविड केअर सेंटर) लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते गणेश बिडकर उपस्थित होते़

अजित पवारांनी पत्रक काढून भाजप नेत्यांवर टीका करतानाच, मी आपल्या कार्यकर्त्यांसाठी सतत उपलब्ध असतो़ तसेच भाजपचे नेते देखील मला भेटत असल्याचा दावा केला आहे़ यावर बोलताना पाटील यांनी, अजित पवारांच्या कार्यक्षमतेबद्दल माझा मनात शंका नाही़ पण वाढत असलेल्या कामाचा व्याप पाहता पवार यांनी एकतर पुण्यातून किंवा मुंबईतून कारभार चालवावा, आणि पुण्याला वेगळा पालकमंत्री द्यावा. परंतु, एकूण गरज लक्षात घेता त्यांनी पुण्यातूनच कारभार चालवायला पाहिजे आणि पुण्यात सहज उपलब्ध व्हायला हवे. लोकांना आता या कोरोना आपत्तीतून दिलासा हवा असल्याचेही ते म्हणाले़