शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

‘तू माझा स्वाभिमान’ स्पर्धा उत्साहात

By admin | Updated: December 22, 2016 02:37 IST

आपल्या मुलांना जीवनाचा आनंद देणारे, त्यांना चांगले भविष्य देणारे त्यांचे पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आपली

पुणे : आपल्या मुलांना जीवनाचा आनंद देणारे, त्यांना चांगले भविष्य देणारे त्यांचे पालक आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य आपली पसंती-नापसंती याकडे दुर्लक्ष करतात. ते मुलांच्या करिअर आणि भविष्याचा मुख्य आधार असतात. यात आईची भूमिका अतिशय संवेदनशील ठरते. कर्तव्य आणि प्रेमाचा संगम आईमध्ये पाहावयास मिळतो. याच विषयावर लोकमत सखी मंच आणि कलर्सतर्फे ‘तू माझा स्वाभिमान’ या कार्यक्रमाचे द्वारका मंगल कार्यालय, चंदननगर येथे आयोजन करण्यात आले होते. यात आई आणि मुलीच्या मैत्रीपूर्ण भावनात्मक नात्यावर आधारित ‘आम्ही दोघी माय-लेकी’ ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या चार राऊंडमध्ये आई-मुलींच्या जोड्यांनी व्यासपीठावर प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेच्या पहिल्या राऊंडमध्ये आई आणि मुलीच्या जोडीने कविता, शेरो-शायरीच्या अंदाजात एकमेकींची ओळख करून दिली. दुसऱ्या राऊंडमध्ये आई-मुलींनी गायन, नृत्य, अभिनय सादर केले. तिसरा राऊंड ‘सिच्युएशन राऊंड’ होता. यात परीक्षकांनी एकेका जोडीसमोर परिस्थिती निर्माण करून त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारले. एका आई-मुलींच्या जोडीला विचारण्यात आले, की ‘जर मुलीसाठी खूप श्रीमंत स्थळ आले आणि त्यांनी लग्नानंतर मुलीला नोकरी करण्यास मनाई केली, तर काय करणार? जर कोणी आईचा अपमान केला तर काय कराल?’ या पद्धतीने विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रश्नांचा सामना स्पर्धकांनी केला. चौथ्या राऊंडमध्ये परीक्षकांनी आई आणि मुलीला त्यांच्या एकमेकींच्या आवडी-निवडींवर प्रश्न विचारले. सिमरन जेठवानी, वनिता बजाज यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या वेळी दिलीप देवकर, मारूती दसगुडे, शिल्पाताई सातव, धनश्री बनसोडे , आशाताई गलांडे आदी उपस्थित होते.स्पर्धेत १० आई-मुलींच्या जोड्यांची निवड आॅडिशनच्या माध्यमातून करण्यात आली. यांतील पाच जोड्यांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. शेखरकुमार यांनी सूत्रसंचालन केले. नेहमीच कौटुंबिक विषय घेऊन येणाऱ्या कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘कलर्स’वर १९ डिसेंबरपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता आई-मुलींच्या मजबूत नात्यावर ‘एक शृंगार... स्वाभिमान’ या मालिकेचे प्रसारण होत आहे. यात गणिताची शिक्षिका शारदा हिने आपल्या दोन मुलींना आधुनिक विचारांसोबतच स्वाभिमानाने जगणे शिकविले. मुलींना कर्मठ करण्यासाठी आधी नोकरी आणि नंतर लग्न करण्याची भूमिका घेऊन शारदा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण करते. नोकरी करण्याचा उद्देश केवळ पैसे मिळविणे नसून, स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग आहे. घर सांभाळून नोकरी करणारी स्त्री आदर्श आणि नोकरीद्वारे करिअरला अधिक महत्त्व देणारी स्त्री आदर्श का नाही, असा प्रश्न शारदा समाजासमोर ठेवते. तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे काय आहेत, हे या मालिकेत दाखविण्यात आले आहे. ‘आम्ही दोघी माय-लेकी’मध्ये एकमेकींना समजून घेणाऱ्या एकमेकींसोबत मैत्रिणीसारख्या वागणाऱ्या आई-मुलींच्या जोड्यांना पुरस्कृत करण्यात आले. उपस्थित सखींनी ‘एक मिनीट’ या गेम शोचा आनंद लुटला. (प्रतिनिधी)