शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

ह्युंदाई कंपनीत चोरी करणाऱ्या तिघांना अटक

By admin | Updated: January 14, 2017 03:01 IST

खालुंब्रे (ता. खेड) येथील ह्युंदाई कंपनीत चोरी केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, चोरीचा माल विकत घेणारा

चाकण : खालुंब्रे (ता. खेड) येथील ह्युंदाई कंपनीत चोरी केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून, चोरीचा माल विकत घेणारा आरोपी फरार झाला आहे. आरोपींना खेड कोर्टात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.गजानन बंडूजी मोहदुरे (वय २५, रा. खालुंब्रे, किरण पवार यांची खोली, ता. खेड, जि. पुणे, मूळ गाव झारगड, ता. राळेगाव, जि. यवतमाळ), शरद पंडित ढोबळे (वय २८, रा. बालाजीनगर, मेदनकरवाडी, चाकण, मूळ गाव पारगाव शिंगवे, ता. आंबेगाव, जि. पुणे) व अंकुश कवडुजी शिंदे (वय २१, रा. खालुंब्रे, तुषार पवार यांची खोली, मूळ गाव वाटखेड, ता. राळेगाव, जि. यवतमाळ) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. यापैकी मोहदुरे याने ह्युंदाई कंपनीतून ३ वेळा चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबतची फिर्याद नीलेश बबन कुंभार (रा. ४०५ मेन आळी, भोर, ता. भोर, जि. पुणे) यांनी १७ डिसेंबर २०१६ रोजी चाकण पोलीस ठाण्यात दिली होती.ह्युंदाई कन्स्ट्रक्शन इक्युपमेंट प्रा. लि. कंपनीमध्ये सी.के.डी. वेअरहाऊस स्टोअरमध्ये डिसेंबर महिन्याच्या १३ तारखेला रात्री दहा ते साडेदहाच्या दरम्यान चोरट्याने वेअरहाऊसच्या पाठीमागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहाच्या खिडकीची जाळी उचकटून आत प्रवेश केला. डार्करूममध्ये असलेले मशीन कंट्रोल युनिट नावाचे पार्ट व म्युझिक सी. डी. प्लेअर मशीन यांचे प्रत्येकी दोन नग असा एकूण ५३ हजार ४४६ रुपये किमतीचा माल चोरून नेला होता. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय घाडगे, संदीप रसाळ, अमोल बोराटे, ऋषिकेश भोसुरे यांनी या चोरीचा तपास लावून चोरट्यांना गजाआड केले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ८) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास यातील आरोपी गजानन मोहदुरे याने खालुंब्रे येथील ह्युंदाई कंपनीच्या एचपीडी स्टोअर पार्टचे स्क्रू ड्रायव्हरने दरवाजे तोडून स्टोअरमधील माल चोरण्याचा प्रयत्न केला असता कंपनीचे सिक्युरिटी एस. एस. सावदेकर व सी. जी. ससाणे यांनी त्याला रंगेहाथ पकडले होते. गजानन हा ह्युंदाई कंपनीत कामाला होता. काही दिवसांपूर्वी त्याला कामावरून काढले होते. यापूर्वीही कंपनीच्या स्टोअरमधून दोनदा चोरी करण्यात तो यशस्वी झाला होता. त्याला अटक केल्यानंतर आणखी तीन आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, त्याच्यासह दोघांना पोलिसांनी गजाआड केले असून, चोरीचा माल विकत घेणारा मात्र फरारी झाला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय घाडगे पुढील आरोपीचा शोध घेत आहेत.