शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जयंतीनिमित्त महामानवास मानवंदना

By admin | Updated: April 14, 2015 23:35 IST

जिल्ह्यात विविध ठिकाणी महामानव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.

जिल्ह्यात विविध ठिकाणी महामानव आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय, शाळांमध्ये बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाबाबत मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. रक्तदान शिबिर, वाचन स्पर्धा, वेशभूषा इत्यादी कार्यक्रम यंदा आकर्षण ठरले. विविध पक्ष, संस्था, संघटना आणि नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.जेजुरी : अवघ्या महाराष्ट्रातील बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या खंडेरायाच्या गडकोट पायथ्याला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अस्थिस्मारक आहे. या पवित्र स्थळाला राष्ट्रीय दर्जा मिळावा, देवसंस्थानसह, नगरपालिका व राज्य शासनाने सुशोभीकरणाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आरपीआयचे युवा नेते गौतम भालेराव यांनी केली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरपीआय अनुयायांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी नगरपालिकेच्या चौकात पुतळ्यास नगराध्यक्षा साधना दरेकर, समीर भूमकर, रामदास शेळके, राजेंद्र दरेकर, मेहबूब पानसरे, वसंत नाझीरकर, बापू भोर, संतोष झगडे, शिवराज झगडे, प्रशांत नाझीरकर, उमेश जगताप, पंढरीनाथ जाधव, चंद्रकांत डिखळे, अविनाश भालेराव, दादा भालेराव, विनोद सोनवणे, विश्वास भोसले, गणेश डिखळे, दीपक भालेराव, योगेश भालेराव, रणजित भालेराव, विशाल डिखळे आदींनी अभिवादन केले.खंडोबा गडकोट पायथ्याशी असलेल्या अस्थि स्मारकामध्ये भीमसैनिक व आंबेडकर अनुयायांनी पुष्पहार अर्पण करीत त्रिशरण -पंचशील व धम्मगाथा केली. या वेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रात्री ८ वाजता भीमगीतांचा कार्यक्रम झाला.महामानवाची एक भगिनी जेजुरीतील रहिवासी होती. या नातेसंबंधातून त्यांच्या अस्थी जेजुरीत आणल्या गेल्या. तत्कालीन भीमसैनिक व नातेसंबंधातील अनुयायांनी स्वखर्चाने येथे अस्थिस्मारक उभारले. या महामानवास वंदन करण्यासाठी ६ डिसेंबर व १४ एप्रिलला जेजुरीत उपस्थिती दाखवावी, असे आवाहन पंढरीनाथ जाधव यांनी केले.लोणीकंद : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त विजयरणस्तंभ भूमीत शेकडो बांधवांनी भेट दिली.दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया शाखेच्या वतीने पुणे-नगर रोडवरील ऐतिहासिक विजयस्तंभावर कार्यक्रमाचे आयोजन केले होते. गौतमबुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी उत्तमराव भोंडवे, सुनीता लोंढे, विश्वनाथ हरगुडे, सत्यन गायकवाड, बाबू लोंढे, दीपक गायकवाड, राजेंद्र मोकळे, सुनील अवचार, संजय माने, भाग्यश्री कसबे, स्नेहा चव्हाण, आदी उपस्थित होते.सिद्धार्थ तरुण मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती सोहळा आयोजित केला होता. अनिता कंद, जनार्दन वाळुंज, अनिल ढोले, श्रीकांत कंद, उत्तमराव भोंडवे, सदाशिव झुरूंगे, संजय कंद, मोहन तापकीर, अमृता कंद, लीलाताई कंद, सुनील कंद, सचिन धुमाळे उपस्थित होते. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याची प्रारंभी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. सागर गायकवाड, शंकर विधाटे यांनी स्वागत केले.खळद : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२४ व्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी खळद ग्रामपंचायत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान, शिवशंभो-जय भवानी, संतसेना, शिवमणी, जय मल्हार तरूण मंडळ यांच्या वतीने सरपंच प्रमिला खळदकर यांच्या हस्ते त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपसरपंच नम्रता कादबाने, मा. उपसरपंच रेश्मा आबनावे, गणेश खळदकर, शिवाजी कामथे, बाळासाहेब कुंभार, विकास कामथे, आत्माराम खळदकर, नामदेव कांबळे, विठठ्ल आबनावे, नाना भांडवलकर, शामकुमार जावळे, ज्ञानेश्वर रासकर, शाहु आबनावे, विठठ्ल आकार्शे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सरपंच खळदकर यांनी येथे भीमरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा ग्रामपंचायतीच्या वतीने बसविण्यात येणार असल्याचे सांगत येथे पुणे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत यांच्या वतीने दलित वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातुन जास्तीचा विकास केला जाईल, असे सांगितले.बावडा : येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. येथील उद्यानात बाबासाहेबांच्या अर्धपुतळ्यास माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी दिवसभर विविध संस्था, संघटना यांनी उद्यानातील बाबासहेबांच्या पुतळ््यास अभिवादन केले. यावेळी नवबौद्ध समाजाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमही झाले. ग्रामपंचायतीच्या वतीनेही जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन अमरसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सुरवड येथेही बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन सरपंच रमेश कोरटकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. येथील बुद्ध ृविहारात कमलाकांत तोरणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.जेजुरी : बेलसर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२४व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. बेलसर तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माऊली जगताप, मनसेचे युवा नेते कैलास जगताप यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी दिगंबर कदम, नीलेश जगताप, रोहिदास जगताप, राहुल आबनावे, हनुमंत जगताप, अनिल जगताप, धीरज जगताप, संदीप जगताप, संजय जगताप, भीमराव कदम, श्यामराव कदम, एडी अशोक धेंडे, महेंद्र गदादे, अर्जुन धेंडे, समीर मुजावर, दीपक खोपडे, संतोष जगताप, गिरीश जगताप, आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी पुरंदर शिक्षक समिती, तालुका समता परिषद, बालसिद्धनाथ प्रतिष्ठान, समता प्रतिष्ठान आदींच्या वतीने अभिवादन करण्यात आले. धीरज जगताप यांनी सूत्रसंचालन केले. कैलास जगताप यांनी आभार मानले.