शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

By admin | Updated: January 2, 2015 00:54 IST

किरकोळ वादावादीमधून पत्नीचा गळा दाबून खून करून पतीने हाताच्या नसा कापून तसेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोथरूडमधील किष्किंधानगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री घडली.

पुणे : किरकोळ वादावादीमधून पत्नीचा गळा दाबून खून करून पतीने हाताच्या नसा कापून तसेच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोथरूडमधील किष्किंधानगरमध्ये गुरुवारी मध्यरात्री घडली. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. तेजश्री दीपक जाधव (वय २१) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर दीपक हरी जाधव (वय ३१, रा. किष्किंधानगर, खंडोबा मंदिरामागे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. मूळचा मुळशी तालुक्यातील रहिवासी असलेला दीपक हा सुरुवातीला केटरिंगची कामे करीत होता. नंतर त्याने पेस्ट कंट्रोलची कामे करायला सुरुवात केली होती. परंतु मागील काही दिवसांपासून तो बेकार होता. त्याचा तेजश्रीसोबत २१ जुलै २०१३ रोजी प्रेमविवाह झाला होता. तेव्हापासून हे दोघेही एकटेच राहात होते. त्याचे आठ वर्षांपूर्वी पहिले लग्न झालेले होते. त्याला पहिल्या पत्नीपासून दोन लहान मुली आहेत. पहिल्या पत्नीने त्याच्याविरुद्ध घटस्फोटासाठी न्यायालयात दावा लावलेला आहे. तेजश्रीचे आई-वडील वारज्यातील रामनगरमध्ये राहण्यास आहेत. दीपकच्या पहिल्या लग्नावरून त्यांच्यामध्ये वाद होत होते. बुधवारी रात्रीही त्यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला. रात्री बारानंतर शेजारी झोपी गेल्यानंतर त्याने रागाच्या भरात तेजश्रीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर हाताच्या नसा कापून लोखंडी आढ्याला ओढणीच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घराला आतून कडी लावलेली असल्यामुळे दिवसभर दार बंदच होते. दुपारी शेजारच्या नागरिकांना शंका आल्यामुळे त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. शेजारच्या नागरिकांनी पत्रा वाकवून घरामध्ये प्रवेश केला असता दोघा जणांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तेजश्रीच्या गळ्यावर सूज होती. तसेच नखांचे व्र्रणही आढळून आले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून देण्यात आले. (प्रतिनिधी)