शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

By admin | Updated: November 19, 2014 04:24 IST

कर्जबाजारीपणाला कंटाळून ५६ वर्षीय पत्नीचा गळा दाबून खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोथरूडमधील भुसारी कॉलनीत मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.

पुणे : कर्जबाजारीपणाला कंटाळून ५६ वर्षीय पत्नीचा गळा दाबून खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोथरूडमधील भुसारी कॉलनीत मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा प्रकार घडला.हेमंत मधुसूदन ताम्हणकर (वय ५८) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. साधना हेमंत ताम्हणकर (वय ५६, रा. दोघेही फ्लॅट नं. १३, बांदल क्लासिक, भुसारी कॉलनी) यांचा त्याने खून केला. नैराश्यातून हेमंत यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने कोथरूड परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.हेमंत हे त्यांची पत्नी साधना व मुलगा केतन (वय ३३) यांच्यासह बांदल क्लासिक येथे भाडेतत्त्वावर फ्लॅट घेऊन राहत होते. त्यांनी २००२ मध्ये इको बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांनी व मुलगा केतन या दोघांनी मिळून टिळक रस्ता व डहाणूकर कॉलनी येथे जिमचा व्यवसाय सुरू केला होता. हा व्यवसाय तोट्यात गेल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसून दीड कोटी रुपयांचे कर्ज झाले होते. घरातील फ्रिज सोडून सगळ्या वस्तू त्यांनी विकून टाकल्या होत्या. दरम्यानच्या काळात साधना यांना २००७ मध्ये पॅरालिसीस झटका येऊन त्या अंथरुणाला खिळून राहिल्या. मंगळवारी सकाळी त्यांचा मुलगा केतन घराबाहेर पडला, त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास तो घरी परतला. त्या वेळी हेमंत यांनी गळफास घेतल्याचे त्याला आढळून आले. साधना या बेडवर निपचित पडल्या होत्या. केतनने कोथरूड पोलिसांना फोन करून माहिती दिली. (प्रतिनिधी)