शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:10 IST

बारामती: कोरोनासारख्या भीषण आपत्तीसोबत लढणाऱ्या महावितरणला आता ‘तौक्ते चक्रीवादळा’चा तडाखा बसला आहे. चक्रीवादळाने बारामती परिमंडलात महावितरणचे ४८ उपकेंद्र बाधित ...

बारामती: कोरोनासारख्या भीषण आपत्तीसोबत लढणाऱ्या महावितरणला आता ‘तौक्ते चक्रीवादळा’चा तडाखा बसला आहे. चक्रीवादळाने बारामती परिमंडलात महावितरणचे ४८ उपकेंद्र बाधित झाले आहेत. यामुळे घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिकसह ३ लाख ४२ हजार ३५८ ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, नैसर्गिक आपत्तीशीही दोन हात करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांनी काही तासांतच ४४ उपकेंद्र व ३ लाख ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत केला आहे. तर कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर्स, ऑक्सिजन निर्मिती केंद्रे यांच्या अखंडित वीजपुरवठ्यासाठी सर्व वीज यंत्रणा २४ तास कार्यरत आहे.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी चक्रीवादळाशी संबंधित परिमंडलांना या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी पूर्वकल्पना देऊन विभागीय पातळीपर्यंत नियंत्रण कक्ष स्थापन करुन सर्व कक्ष मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षाशी कायम संपर्कात राहून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. पुणे, सोलापूर व सातारा जिल्ह्यांत चक्रीवादळ येण्यापूर्वीच वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने वीज यंत्रणेला मोठा तडाखा दिला. बारामती परिमंडलात रविवारी दुपारपर्यंत मिळालेल्या महितीनुसार ५४७ विजेचे खांब कोसळले. तर १८ हजार ७७३ रोहित्र बंद पडल्याने ८६९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र, वीज कर्मचाऱ्यांनी अविरत परिश्रम घेऊन १५ हजार ३१९ रोहित्रांचा वीजपुरवठा पर्यायी मार्गाने पूर्ववत करुन बाधितपैकी ७९७ गावांचा वीजपुरवठा पूर्ववत केला, तर उर्वरित गावांमधीलही बहुतांश वीजपुरवठा पर्यायी मार्गाने सुरू करण्यात येत आहे.

चौकट

वीजपुरवठा पूर्ववत करताना कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटर्स, ऑक्सिजन प्लान्ट, इतर सर्व रुग्णालये, लशीकरण केंद्रे, मोबाईल मनोरे, पाणीपुरवठा, रेल्वेसह सर्व अत्यावश्यक सेवा यांचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण प्रयत्नशील असून, संचालक (संचलन) संजय ताकसांडे व प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांचे निर्देशानुसार मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी सर्व संबंधित विभागांना वादळानंतर पर्यायी मार्गाने तातडीने वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी साहित्य व मनुष्यबळ सदैव तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व वीजपुरवठा कमीत वेळेत सुरळीत करण्यासाठी महावितरण यंत्रणा काम करत आहे.

फोटो ओळी : वादळामुळे वीज यंत्रणेचे झालेले नुकसान.