शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग रुंदीकरणातील अडथळे हटविले

By admin | Updated: February 27, 2016 04:26 IST

पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर येथील बाग (ता. हवेली) येथील रस्तारुंदीकरणात येणाऱ्या अडथळ्यांवर आजही (दि. २६) कारवाई सुरू ठेवण्यात आली. संपादित जागेत येणारी

नसरापूर : पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर येथील बाग (ता. हवेली) येथील रस्तारुंदीकरणात येणाऱ्या अडथळ्यांवर आजही (दि. २६) कारवाई सुरू ठेवण्यात आली. संपादित जागेत येणारी अतिक्रमणे हटविण्यात आली असून, ही कारवाई सुरू राहणार आहे. आज सायंकाळी साडेसातपर्यंत कारवाई सुरू होती. महसूल विभागाच्या वतीने दि. २४ पासून मोहीम सुरू आहे.आजही संपादित जागेतील अतिक्रमणे प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांच्या उपस्थितीत हटविण्यात आली. या वेळी भोर उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे यांच्यासह जलद कृती दलाची तुकडी तैनात ठेवण्यात आली होती. ३ जेसीबी, २ पोकलेन, ५ डंपर यांचा वापर करण्यात आला. सकाळपासून चालू असलेली कारवाई संध्याकाळी प्रांताधिकारी आल्यानंतरच वेगाने सुरू करण्यात आली. या वेळी स्थानिक नागरिकांनी अतिक्रमणाविरुद्ध नाराजी व्यक्त केली. ‘आमचा या सरकारी कामाला विरोध नाही; मात्र हद्द निश्चिती करताना नेमकेपणा येऊन न्याय मिळत नाही,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केली.प्रांताधिकारी बर्गे म्हणाल्या, की १३ वर्षांपूर्वी निवाडा झाल्याप्रमाणे जॉइंट मेजरमेंटप्रमाणे ही कारवाई आहे. त्यातल्या ९७ टक्के लोकांनी पेमेंट घेतलेले आहे. आम्ही जी अतिक्रमणे काढतोय, त्यातला एक इंचही असा नाही की, जो सरकारच्या मालकीचा नाही. सरकारने रीतसर संपादित केलेले आहे. त्याची भरपाई दिलेली आहे. (वार्ताहर)