शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळेतील नम्रता निघाली युरोपला

By admin | Updated: June 16, 2015 00:52 IST

महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या दर्जा चांगला नसतो, तिथे शिक्षणासाठी चांगले वातावरण नसते असा सर्वसाधारण समज आहे.

पुणे : महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या दर्जा चांगला नसतो, तिथे शिक्षणासाठी चांगले वातावरण नसते असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, गंज पेठेतील पालिकेच्या आचार्य विनोबा भावे शाळेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या नम्रताने हा समज खोटा ठरविला आहे. कारण ती आता पुढील शिक्षणासाठी युरोपला चालली आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजेस या संस्थेच्या एका शिष्यवृत्तीअंतर्गत तिची निवड केली आहे. नम्रता खानविलकर असे या विद्यार्थिनीचे नाव. आठवीपर्यंतचे शिक्षण बिबवेवाडीतील पालिकेच्या शाळेत पूर्ण केल्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी आचार्य विनोबा भावे शाळेत प्रवेश घेतला. इथे तिने इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतले. दहावीच्या परीक्षेत तिला ८७.६० टक्के गुण मिळाले आहेत. तिची आई आशा खानविलकर या गृहिणी असून, वडील अनंत खानविलकर हे खासगी कंपनीत चालक म्हणून काम करतात. आता नम्रता अकरावी व बारावीच्या शिक्षणासाठी युरोप खंडातील अरमेनिया इथे जाणार आहे. युनायटेड वर्ल्ड कॉलेजस या संस्थेची जगभरात विविध ठिकाणी शाळा व महाविद्यालये आहेत. संस्थेमार्फत शिक्षणासाठी विविध शिष्यवृत्त्या दिल्या जातात. या शिष्यवृत्तीसाठी शाळेमार्फत पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. देशातील सुमारे ५५० विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. विविध टप्प्यांवर परीक्षा, चर्चा, मुलाखत, उपक्रमाच्या माध्यमातून १२० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये भावे शाळेतील नम्रतासह रमेश बी. व श्लोक सदलाकपूरकर यांची निवड झाली आहे. ही शाळा ही आकांक्षा फाऊंडेशन या संस्थेतर्फे चालविली जाते. तिघांपैकी नम्रताची निवड अरमेनियातील महाविद्यालयात झाली आहे. तर दोघे मुळशीतील महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतील. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना नम्रता म्हणाली, की मला खूप आनंद झाला आहे. शाळेनेच अर्ज केला होता. पण, अभ्यास करून त्यात यश मिळविले. तिथे नियमित शिक्षणाबरोबरच खूप उपक्रम असल्याने फायदा होणार आहे. आशा खानविलकर यांनीही आपल्या मुलीच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. आपल्या मुलींनी इंग्रजी शिकावे असे खूप वाटत होते. पण त्यांनी अपेक्षेपेक्षा खूप काही दिले आहे. नम्रताच्या या यशात तिच्या शाळेचा मोठा वाटा आहे. तसेच वडिलांनीही खूप कष्टाने सर्वांना उभे केले आहे.