शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मानवता हाच खरा धर्म !

By admin | Updated: November 30, 2015 01:59 IST

धर्मात राजकारणाचा प्रवेश झाला की विद्वेश निर्माण होतो, माणसा-माणसांत वैराची भावना निर्माण होते, शत्रुत्व निर्माण होते.

पुणे : धर्मात राजकारणाचा प्रवेश झाला की विद्वेश निर्माण होतो, माणसा-माणसांत वैराची भावना निर्माण होते, शत्रुत्व निर्माण होते. कुठल्याही धर्मग्रंथात दहशतवादाचा पुरस्कार केलेला नाही. मानवता हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, समाजसेवक अब्दुल कादीर मुकादम यांनी केले.‘वारजे विकास कृती समिती’तर्फे रविवारी राष्ट्रीय एकात्मता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ‘असहिष्णुता व दहशतवाद’ या विषयावर मुकादम बोलत होते. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख भानुप्रसाद बर्गे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मेळाव्याचे संयोजक नगरसेवक दिलीप बराटे, नुरुद्दिन पटेल, बाबा खान व्यासपीठावर होते.मुकादम म्हणाले, सुशिक्षित तरुणांना संमोहित करून दहशतवादी कृत्याला बळी पाडले जात आहे. दहशतवादी कृत्याला तरुण बळी पडणार नाही, यासाठी समाजानेच प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अशा गोष्टींचा केवळ निषेध करून थांबविता येणार नाही. पाश्चात्य देशातील आणि भारतातील दहशतवादी कृत्यांबाबत वेगवेगळा विचार करावा लागेल. भारतातील दहशतवादाला पाकिस्तानचे पाठबळ मिळत आहे. कुवेत, दुबई, इराक, तुर्कस्तान, इराणच्या मनात अमेरिकेविषयी प्रचंड राग आहे. त्याचे कारण तेलसाठ्याचे राजकारण आहे. या राष्ट्रांना दावणीला बांधण्याचा अमेरिकेचा डाव आहे. इराक अमेरिकेला बळी न पडल्याने इराकला नेस्तनाबूत करण्यात आले. वास्तविक, इराकमधून एकही दहशतवादी तयार झालेला नाही. भारतासमवेत युद्ध करू शकत नाही, हे पाकिस्तानला माहीत असल्याने छुपे युद्ध खेळले जात आहे. दहशतवादी कृत्ये करणाऱ्यांचा धर्मपालनाचा अधिकार काढून घेण्यासाठी जागतिक पातळीवर कायदा केला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सहिष्णुता आणि असहिष्णुता यातील फरकही त्यांनी विषद केला.दहशतवादाचा निषेध करीत समतेचा संदेश देणारे पथनाट्य विद्यार्थ्यांनी सादर केले. दिलीप बराटे यांनी मेळाव्याच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. नवाज खान, हमीद शेख, सचिन दांगट, नूर सय्यद, मदिन खान, आलम पठाण, दत्ता झंजे आदी उपस्थित होते. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले. देवेंद सूर्यवंशी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)