शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

‘मूठभर धान्य’ आपल्या चिमुरड्यांसाठी

By admin | Updated: March 13, 2015 06:26 IST

‘लोकसहभागातून अंगणवाड्या’ या आनंदवाड्या करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद प्रशासनाने हाती घेतला असून, आतापर्यंत १० कोटी रकमेचे साहित्य प्राप्त झाले आहे.

बापू बैलकर, पुणे‘लोकसहभागातून अंगणवाड्या’ या आनंदवाड्या करण्याचा उपक्रम जिल्हा परिषद प्रशासनाने हाती घेतला असून, आतापर्यंत १० कोटी रकमेचे साहित्य प्राप्त झाले आहे. त्याचे पुढचं पाऊल म्हणून ‘मूठभर धान्य’ ही नवी संकल्पना राबविण्यात येत आहे. कुपोषण निर्मूलनाकरिता मूठभर धान्य आपल्या चिमुरड्यांसाठी द्या, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंढे यांनी केले आहे.जिल्ह्यात ४,५७0 अंगणवाड्या असून, ३ ते ६ वयोगटांतील १ लाख २६ हजार बालके शिकत आहेत. बालकांमधील कुपोषण निर्मूलनासाठी समाजाचे योगदान मिळाल्यास या उपक्रमाला गती मिळू शकते, तसेच समाजाचे संनियंत्रण राहत, या संकल्पनेतून सन २०१४-१५मध्ये लोकसहभागातून आदर्श अंगणवाडी हा उपक्रम सुरू झाला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. सुमारे १० कोटी रकमेचे साहित्य अंगणवाड्यांमध्ये प्राप्त झाले. यातून गणवेश, ओळखपत्र, बेबी चेअर्स, डायनिंग टेबल, वॉटर फिल्टर, टीव्ही/ डीव्हीडी, बोलक्या भिंती, कार्पेट, फॅन, भांडी इ. वस्तू देण्यात आल्या. यामुळे अंगणवाड्यांचे स्वरूप बदलले व अंगणवाड्यांचा दर्जा उंचावला. अंगणवाड्यांमधील पटसंख्याही वाढली.आता जिल्हा प्रशासनाने ‘मूठभर धान्य’ ही योजना राबविण्यात येत आहे. पौष्टिक व सर्व घरांमध्ये सहजासहजी उपलब्ध होणारे बटाटा, शेंगदाणे व गूळ या पदार्थांचा यात समावेश केला आहे. १ मार्चपासून या उपक्रमामध्ये सहभागी होण्याबाबत ग्रामस्थांना आवाहन करण्यात येत असल्याचे मुंढे यांनी सांगितले.