पुणे : जाणिवपूर्वक आपल्याविरुद्ध मतदारांना संभ्रमित करणारा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करण्यात आला असून याचा तपास करण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक विशाल तांबे यांनी सहकारनगर पोलिसांकडे केली आहे. यासंदर्भात एक निवेदन त्यांनी पोलिसांना दिले आहे. तांबे यांनी राष्ट्रवादीकडून धनकवडीमधून निवडणूक लढविली आहे. मतदानाच्या दिवशी विरोधकांनी मतदारांना संभ्रमित करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. यामागे कुरघोडीचे राजकारण असून हा प्रकार बदनामीकारक आहे. या सर्व प्रकाराचा योग्यरित्या तपास करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
विशाल तांबे यांची पोलिसांकडे तक्रार
By admin | Updated: February 22, 2017 03:14 IST