शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीनाथ म्हस्कोबा व जोगेश्वरी यांचा वीर येथे हळदी समारंभ

By admin | Updated: February 10, 2017 02:53 IST

श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषात आज श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा हळदी समारंभ हजारो भाविकांच्या

खळद : श्रीक्षेत्र वीर (ता. पुरंदर) येथे ‘सवाई सर्जाचं चांगभलं’च्या जयघोषात आज श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांचा हळदी समारंभ हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला. या वेळी देवाला हळद लावण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. आज दुपारी ढोलताशाच्या गजरात भव्य मिरवणुकीने मानकरी राऊतवाडीचे राऊत मंडळी व हजारो महिला हळद घेऊन देऊळवाड्यात आल्या. प्रथम मंदिराला प्रदक्षिणा घालण्यात आली व नंतर मंदिरात प्रवेश केल्यावर देवाची पूजा करून देवाला हळदीचा पोषाख घालण्यात आला. यानंतर राऊत मंडळी व गावकरी यांचे वतीने देवीची खणानारळाने ओटी भरण्यात आली. या वेळी श्रींना चाफ्याच्या फुलांची मुंडवळी बांधण्यात आली. सर्व सोपस्कर विधिवत पार पडल्यानंतर मानाच्या महिलांच्या हस्ते देवास हळद लावण्यास शुभारंभ करण्यात आला. राऊत मंडळींना सर्वप्रथम हळदीचा मान असल्याने त्यांच्या वतीने देवाला हळद लावली व यानंतर वीर गावातील व परिसरातील महिलांच्या हस्ते देवास हळद लावण्यात आली.याप्रसंगी मानकरी शिंगाडे, तरटे, व्हटकर, ढवाण, वीर मुकदम पाटील, चंद्रकांत धुमाळ, तात्या बुरूंगले, बापू बुरूंगले, राजाभाऊ बुरूंगले, सालकरी, पुजारी, देवस्थानचे चेअरमन बाळासाहेब धुमाळ, सचिव तय्यद मुलाणी, व्हा. चेअरमन संभाजी धुमाळ, विश्वस्त दिलीप धुमाळ, मंगेश धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, नामदेव जाधव, बबन धसाडे, अशोक वचकल, सुभाष समगीर उपस्थित होते.सालाबादप्रमाणे शुक्रवार दि. १० फेब्रु. माघ शु. पौर्णिमेपासून येथे देवाच्या दहा दिवसांच्या यात्रेला सुरुवात होत आहे. या निमित्ताने येथे देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासन यांच्या वतीने सर्व तयारी करण्यात आली असून, साधारणपणे लग्नसोहळ्यासाठी तीन लाखांपर्यंत भाविक येण्याचा अंदाज देवस्थानचे चेअरमन बाळासाहेब धुमाळ, सचिव तय्यद मुलाणी यांनी सांगितला.दहा दिवस येथे मोठी यात्रा भरेल व मारामारीने यात्रेची सांगता होईल.