शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक कशी घेणार?

By admin | Updated: December 31, 2016 05:35 IST

महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले कर्मचारी मिळवण्यात पालिकेच्या निवडणूक शाखेसमोर अनेक अडचणी येत आहेत. त्याची दखल घेत निवडणूक

पुणे : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक असलेले कर्मचारी मिळवण्यात पालिकेच्या निवडणूक शाखेसमोर अनेक अडचणी येत आहेत. त्याची दखल घेत निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांची माहिती न देणाऱ्या कार्यालयप्रमुखांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मनपा निवडणूक शाखेला दिले आहेत.निवडणूक प्रक्रियेसाठी पालिकेला वर्ग १ पासून ते वर्ग ४ पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर किमान २५ ते ३० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज लागते. निवडणूक आयोगाकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नाही. त्यामुळे हे अधिकारी व कर्मचारी, सरकारी, निमसरकारी तसेच खासगी शिक्षण सस्थांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांमधून नियुक्त केले जातात. त्यासाठी त्यांना मानधनही अदा केले जाते. मात्र, मतदान केंद्रातील कामकाज, त्यासाठी दूरवर जावे लागणे, गैरसोयी सहन कराव्या लागणे, द्यावा लागणारा वेळ, त्या तुलनेत उशिरा व कमीच मिळणारे मानधन यामुळे अनेकांचा, त्यातही खासगी संस्थांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कल हे काम टाळण्याकडेच जास्त असतो. त्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा वापर केला जातो. मात्र आता संस्थांप्रमुखांकडूनच त्यांच्याकडील कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.पालिका निवडणूक प्रक्रियेचे निवडणूकप्रमुख म्हणून महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालये, खासगी संस्था यांना त्यांच्याकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती पालिकेकडे पाठविण्यासंबंधी पत्र दिले आहे. मात्र यातील अनेक संस्थांनी या पत्राची दखलच घेतलेली नाही.