शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

... तर आदिवासी स्वसंरक्षण कसे करू शकतील?

By admin | Updated: December 22, 2014 23:29 IST

भीमाशंकर अभयारण्यात राहणारा आदिवासी पिढ्यान्पिढ्या येथील जंगलात राहत आहे. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला

भीमाशंकर : भीमाशंकर अभयारण्यात राहणारा आदिवासी पिढ्यान्पिढ्या येथील जंगलात राहत आहे. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला आहे. या लोकांनी जंगल राखले, प्राणी वाढवले. जंगलात फिरताना त्यांच्याकडे स्वसंरक्षणासाठी कुऱ्हाड, कोयते नसतील, तर ते त्यांचे स्वसंरक्षण कसे करू शकतील? वन विभागाने आदिवासी शेतकऱ्यांना अटक करून त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई कर्णिक यांनी सांगितले.कुसुमताई कर्णिक गेली ३५ वर्षे आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात काम करीत आहेत. भीमाशंकर अभयारण्य घोषित झाल्यापासून येथील गावांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला आहे. अभयारण्यातील गावे उठवली जाऊ नयेत, यासाठी त्यांनी आंदोलने केली आहेत. पिंपरगणे येथील पाच शेतकऱ्यांना शिकारीसाठी जात असल्याप्रकरणी अटक करण्यात असल्याचे त्यांना समजताच या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कुसुमताई कर्णिक यांनी घोडेगाव येथे येऊन येथील ग्रामस्थांशी चर्चा केली. या वेळी कुसुमताई कर्णिक म्हणाल्या, की जंगलात राहणाऱ्या माणसाला जंगलाचे कायदे चांगले समजतात. त्यामुळे जंगलात राहणारा आदिवासी शिकार करतो, यात चूक मानता येणार नाही. कायदे आत्ता झाले आहेत. हे आदिवासी पिढ्यान्पिढ्या जंगलात राहत आहेत. जंगलातील कंदमुळे खाऊन शिकारी करून हा आदिवासी समाज वाढला आहे. या आदिवासींनीच जंगल राखले, प्राणी वाढवले.शासन कु ऱ्हाडबंदी, कोयताबंदी करेल, पण जंगलात राहणाऱ्या माणसाकडे ही हत्यारे पाहिजेतच. शहरात कोणी कुऱ्हाड, कोयता घेऊन फिरले तर ठीक नाही; मात्र जंगलात राहणाऱ्या माणसाकडे ही हत्यारे नसतील, तर तो त्याचे संरक्षण करू शकत नाही. जंगलात फिरताना झाड आडवं आलं, तर त्याची फांदी तोडावीच लागते. भीमाशंकर अभयारण्यात असणारी गावे पूर्वीपासून आहेत. येथील गावांना शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. अभयारण्य जाहीर झाल्यानंतर येथील गावांना उठवण्याचे कारस्थान चालले होते. परंतु, आम्ही ते हाणून पाडले. लोक स्वत:हून जंगलातून निघून जावेत, यासाठी वन विभाग अशा प्रकारे त्रास देत आहे. महिला कोयता घेऊन फिरल्या, तर त्यांचे कोयते जप्त केले जातात, हा कोणता कायदा. पिंपरगणे गावाजवळच वाघोबाचे देऊळ आहे. वाघाबरोबरच राहायचे तर कसे राहावे, याची चांगली समज या लोकांमध्ये आहे. वन विभागाने ही कारवाई करून त्यांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणली आहे, असे कुसुमताई कर्णिक म्हणाल्या. (वार्ताहर)