पुणो : भावाशी भांडणो झाल्याच्या रागामधून पुतण्याचे अपहरण करून त्याला उत्तर प्रदेशात घेऊन जाणा:या चुलत्याला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले.
अपहरणाचा गुन्हा
दाखल झाल्यापासून अवघ्या
तीन तासांत हा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी सांगितले.
रामप्रीत विदेशीलाल जयस्वाल (वय 3क्, रा. कच्छलाल, जि. बनारस, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचा सख्खा भाऊ संतोष हा भोसरी परिसरात राहण्यास आहे. संतोष हा त्याचा मुलगा आकाश (वय 6) आणि पत्नीसह राहण्यास आहे. आरोपी त्यांच्याकडे राहण्यास आला होता.
काही दिवसांपूर्वी आरोपीची संतोष याच्याशी भांडणो झाली
होती. ही भांडणो पोलीस ठाण्यात गेली होती. त्यानंतर तो वेगळा राहू लागला होता.
रामप्रीत याने शनिवारी सकाळी आकाश याचे अपहरण केले. त्याला घेऊन तो पुणो रेल्वे स्थानकावर आला होता. दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्यात सकाळी साडेआठच्या सुमारास अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.
रेल्वे स्थानकावर गस्त घालीत असलेल्या लोहमार्ग पोलिसांना रामप्रीत दिसला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे पोलिसांनी त्याला हटकले. तेव्हा त्याने आकाश हा आपला मुलगा असल्याचे सांगितले. त्याबाबत मुलाकडे चौकशी केली असता त्याने तो आपला चुलता असल्याचे सांगितले. त्याचा पत्ता विचारून पोलिसांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. तेव्हा त्याचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली.
तातडीने एमआयडीसीचे पोलीस रेल्वे स्थानकावर दाखल झाले. ही कारवाई लोहमार्ग पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अभय परमार, पोलीस कर्मचारी माधव केंद्रे, अनिल गुंदरे, कल्पना खैरे यांनी केली. पानसरे यांनी कर्मचा:यांना रोख बक्षीस जाहीर केले आहे.(प्रतिनिधी)
आकाशला घेवून जाणार उत्तर प्रदेशला
कायदेशीर प्रक्रिया पार पाडल्यानंतर आकाशला त्याच्या आईवडिलांच्या ताब्यात देण्यात आले. तर, आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपी आकाशला घेऊन उत्तर प्रदेशला जाणार होता. त्याची रेल्वे चुकल्यामुळे तो कल्याणला जाऊन तेथून उत्तर प्रदेशला जाणार होता. त्याच्याकडे कल्याणची दोन तिकिटेही मिळून आली आहेत.