शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उच्चदाब विद्युत तारांखाली घरे

By admin | Updated: December 19, 2014 01:57 IST

नियमानुसार उच्चदाब विद्युत मनोऱ्यांपासून दोन्ही बाजूस साडेआठ मीटर जागा सोडून बांधकाम करावे लागते. परंतु आधीच अनधिकृत बांधकामांना ऊत आला

नीलेश जंगम ल्ल पिंपरीअति उच्च दाब वाहिन्यांच्या आजूबाजूला घरे उभारून हजारो नागरिक मृत्यूच्या छत्रछायेत राहत आहेत. वादळी वारा, पावसाळ्यात या वाहिन्या तुटल्यास मोठी दुर्घटना घडू शकते, अशी स्थिती मोरेवस्ती-चिखली परिसरात निर्माण झाली आहे.नियमानुसार उच्चदाब विद्युत मनोऱ्यांपासून दोन्ही बाजूस साडेआठ मीटर जागा सोडून बांधकाम करावे लागते. परंतु आधीच अनधिकृत बांधकामांना ऊत आला असताना यात भर म्हणजे मनोऱ्याच्या बाजूला मनोऱ्यावरील उच्चदाब विद्युत वाहिनीखाली लोकांनी घरे बांधली आहेत. घराच्या छतावर पत्रा असल्याने धोकादायक परिस्थिती आहे.शिवरकर चौक ते साने चौक या विकसित आराखड्यातील २४ मीटर रस्त्याला आणि अष्टविनायक चौक ते चिखली-आकुर्डी या १८ मीटर चिंचेचा मळा रस्त्यावरुन विद्युत मनोऱ्याची रांग गेली आहे. वाहिन्यांची रांग गेल्याने त्या वेळी शेतकऱ्यांना मोबदला देऊन जागेचा ताबा घेण्यात आला. या मनोऱ्याच्या रांगेच्या दोन्ही बाजूला ८०० ते १२०० मीटर लांबीच्या बसक्या घरांच्या सोसायट्या, गल्ल्या आहेत. संतकृपा हौसिंग सोसायटी ते श्री गणेश कॉलनीपर्यंत जवळपास ५० सोसायट्या आहेत. या सर्व सोसायट्यांतील रहिवाशांची संख्या सुमारे ४० हजार इतकी आहे. लांबच लांब सोसायटीच्या गल्ल्या असल्याने मनोऱ्यांच्या रांगेखाली रस्ता तयार करण्यात आला. यामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटला; परंतु त्यालगत बांधकाम करीत लोकांनी जोखीम पत्करली आहे.मनोऱ्यांच्या खालून जाणारा रस्ता काही ठिकाणी २५ फुटी, ३० फुटी, तर काही ठिकाणी ५० फुटांइतका आहे. रस्ता झाल्याने वर्दळ वाढू लागली आहे. रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांनी उत्पन्नाचे साधन म्हणून रस्त्याच्या बाजूची भिंत पाडून त्या ठिकाणी शटर बसविले आहे. चार पत्रे टाकून दुकाने थाटली. काही लोक स्वत: दुकान चालवतात, तर काहींनी भाड्याने दिली आहेत. काही लोकांनी तर घराच्या बाजूला तिन्ही बाजूने पत्रे ठोकून वरुन पत्र्याचे छत तयार करून दुकाने थाटली आहेत. यामुळे रस्त्याची रुंदी कमी-जास्त होत गेली. बांगड्या, चप्पल, किराणा, केश कर्तनालय, मोबाइल, भाजीविक्री, इस्त्री, स्टेशनरी, पानटपरी, डेअरी, लेडीज शॉपी, पार्लर अशा स्वरूपाची ३०० हून अधिक दुकाने या रस्त्यालगत मनोऱ्यांच्या तारांच्या खालीच थाटली आहेत. पावसाळ्यात येथे दुकानाच्या पत्र्यांमध्ये वीज प्रवाह असतो. छत्री घेऊन चाललेल्या व्यक्तीच्या छत्रीला सुद्धा विजेचा धक्का बसतो.इतकी धोकादायक परिस्थिती असतानाही थोडेफार पैसे कमविण्याच्या लालसेपोटी लोकांनी स्वत:चा जीवही धोक्यात घातला आहे.