शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

बारामती तालुक्यात घरोघरी अ‍ॅन्टिजन तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:09 IST

बारामती : तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, बुधवारी (दि. २८) पंचायत समिती ...

बारामती : तालुक्यामधील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, बुधवारी (दि. २८) पंचायत समिती आरोग्य विभागामार्फत शहर व ग्रामीण भागात घरोघरी जाऊन अ‍ॅन्टिजन तपासणी करण्यात आली. एकूण ९२३ अ‍ॅन्टिजन तपासणी करण्यात आल्या. यामध्ये १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

या तपासणी कॅम्पपूर्वी संबंधित गावातील समुदाय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी यांनी योग्य ते नियोजन करून जास्तीत जास्त लोकांची तपासणी करून घ्यावी. तसेच संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधिकारी, सरपंच यांचेमार्फत पोलीस यंत्रणेला कळविण्यात यावे व त्यांची मदत अ‍ॅन्टिजन कॅम्पकरिता घ्यावी, अशा सूचनादेखील आरोग्य अधिकारी यांनी दिल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधी यांचादेखील सहभाग घेऊन जास्तीत जास्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखील करण्यात आले होते.

तपासणी शिबिर दंडवाडी, जैनकवाडी, घाडगेवाडी, चोपडज, जळगाव सुपे, लाटे माळवाडी, डोर्लेवाडी, आर.एस.सुपा, बारामती शहर सुपरस्प्रेडर, जीएमसी सीसीसी या ठिकाणी राबविण्यात आले. यामध्ये दंडवाडी १०५, घाटगेवाडी ५७, जैनकवाडी १०५, चोपडज ३९, जीएमसी सीसीसी १४१, बारामती शहर सुपरस्प्रेडर २२० इतक्या तपासण्या करण्यात आल्या. याठिकाणी एकही पॉझिटिव्ह रुग्ण मिळाला नाही. तसेच जळगाव सुपे १२१ तपासणीमध्ये ०६, लाटे माळवाडीमध्ये ११६ तपासणीमध्ये ०५, आर.एस.सुपा १० तपासणीमध्ये ०१, डोर्लेवाडीमध्ये ०९ तपासणीमध्ये ०१, अशा शहर आणि ग्रामीण भागामध्ये एकूण ९२३ अ‍ॅन्टिजन तपासणी करण्यात आल्या. यामध्ये १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, असे पंचायत समिती आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.

पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने सुरू असलेली अ‍ॅन्टिजन तपासणी मोहीम.

२९०७२०२१-बारामती-०२