शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

कारखान्यांच्या जागेवर बनताहेत गृहसंकुले

By admin | Updated: August 13, 2014 04:35 IST

अनेक उद्योजकांनी कारखान्यांसाठी घेतलेल्या मोक्याच्या जागांवर आलिशान गृहप्रकल्प, व्यापारी संकुल उभारण्यास प्रारंभ केला

संजय माने, पिंपरीअनेक उद्योजकांनी कारखान्यांसाठी घेतलेल्या मोक्याच्या जागांवर आलिशान गृहप्रकल्प, व्यापारी संकुल उभारण्यास प्रारंभ केला. औद्योगिक क्षेत्राचे निवासी क्षेत्रात रूपांतर करण्याची कायद्यात तरतूद आहे. त्याचा फायदा उठवला. अनेक बड्या उद्योजकांनी कामगारांना कामावरून कमी करून उत्पादन प्रकल्प अन्यत्र हलविले. कारखान्याच्या जागांवर इमारतीचे उंच इमले उभारले. औद्योगिकचे निवासी क्षेत्रात रूपांतर करून त्यांनी बांधकाम क्षेत्रातही पदार्पण केले. या बदलात लाखो कामगार विस्थापित झाले आहेत.औद्योगिकचे निवासी क्षेत्रात रूपांतर करण्याची कायद्यातील तरतूद उद्योजकांच्या पथ्यावर पडली आहे. गेल्या दहा वर्षांत त्याचा अनेक उद्योजकांनी फायदा उठवला आहे. आतापर्यंत सुमारे १२० एकर जागेचे औद्योगिकमधून निवासी क्षेत्रात रूपांतर करण्यात आले आहे. मुंबई-पुणे महामार्गालगतच्या मोक्याच्या कारखान्यांच्या जागेवर असेच शॉपिंग मॉल, हॉटेल असे प्रकल्प उभारण्याचे उद्योजकांचे प्रयोजन आहे. विकास नियंत्रण नियमावली आणि शहराच्या विकास आराखड्याचे नियोजन करताना, अशाच प्रकारे उद्योजकांचे हित साधण्याचा प्रयत्न झाला आहे. पूर्वी दाट लोकवस्तीच्या भागात औद्योगिक क्षेत्र घोषित कसे केले. असा प्रश्न सहज कोणालाही पडल्याशिवाय राहात नाही. शहरातील औद्योगिक भूखंडावर अधिमूल्य आकारून निवासी अथवा व्यावसायिक बांधकाम करण्यास परवानगी देण्याचा निर्णय २००४ मध्ये शासनाने घेतला. त्याबाबतचा अध्यादेश महापालिकेस प्राप्त होताच, तीन वर्षांत महापालिकेने ११ प्रकरणांना मंजुरी दिली. औद्योगिकचे निवासी वापरात रूपांतर करताना विशिष्ट अधिमूल्य आकारण्यात येत होते. दहा टक्के अधिमूल्य आकारण्याची तरतूद होती. मात्र प्रकल्प पूर्णत्वास आले, तरी महापालिकेला सुविधा क्षेत्रासाठी दहा टक्के जागा देण्यास विलंब केला गेला. महापालिकेला १० हजार ८७४ चौरस मीटर जागा ताब्यात मिळाली आहे. उर्वरित जागा ताब्यात घेण्याचे अद्याप प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने १७ ठिकाणच्या औद्योगिक भूखंडाचा निवासी वापर करण्यास परवानगी दिली आहे. त्यामध्ये सर्व्हे क्रमांक ४२ ७०, ३८७६, ५७६३, ५८४२, २१०, २०९, ३३, ३४, १४२, १७१, १७२, १७३, ११८१, ११८२, २९ या ठिकाणच्या कंपन्यांच्या जागांचे निवासी क्षेत्रात रूपांतर झाले आहे. शासनाचे हे धोरण उद्योजकांसाठी लाभदायक ठरले असले तरी कामगार वर्गासाठी मात्र नुकसानकारक ठरू लागले आहे. या जागेवरील कंपन्या स्थलांतरित झाल्या. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या हातचा मात्र रोजगार गेला.