शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दूध व्यवसायाला घरघर

By admin | Updated: January 8, 2017 03:16 IST

शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतो. पूर्वी सगळीकडे सहकारी दूध संस्था होत्या. परंतु, अलीकडील काळात खासगी दूध संस्थांचे जाळे पसरले आहे. मात्र, खर्चाचा

लासुर्णे : शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय करतो. पूर्वी सगळीकडे सहकारी दूध संस्था होत्या. परंतु, अलीकडील काळात खासगी दूध संस्थांचे जाळे पसरले आहे. मात्र, खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे.सध्या खासगी दूध संस्था प्रतिलिटर २२ रुपये दर देतात. तर पुणे जिल्हा कात्रज संघ हा प्रतिलिटर साडेपंचवीस रुपये आणि दिवाळीला सभासदांना प्रतिलिटर एक रुपया बोनस स्वरूपात देतो. त्यामुळे त्यांचा दर साडेसव्वीस रुपये प्रतिलिटर मिळतो. या दोन संस्थेत प्रतिलिटर साडेतीन रुपये फरक आहे. तसेच या खासगी दूध संस्थांचे पशुखाद्य निर्मितीचे कारखाने असल्याने पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले आहेत. जे शेतकरी खासगी दूधसंस्थेला दूध देतात त्यांचा खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. यासाठी या खासगी दूध संस्थेवर तसेच पशुखाद्याच्या कारखान्यांवर शासनाने निर्बंध लादण्याची मागणी होत आहे.इंदापूर तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी दूध व्यवसाय करतात. परंतु, अलीकडे खासगी दूध संस्थांच्या मनमानी कारभारामुळे पुणे जिल्हा कात्रज संघापेक्षा खासगी दूध संस्थांचे दूधदर फारच कमी असल्याने या भागातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. या भागात खासगी दूध संस्थेच्या पशुखाद्याची ५० किलोची गोणी १ हजार ६० रुपये तर ६० किलोची ११७० रुपये मिळते. एक गाय जर १८ लिटर दूध देत असेल तर त्या गाईला एका दिवसात होणार खर्च असा, की एका दिवसात एका गाईला सुका चारा ५ ते ७ किलो २० ते २५ रुपये,ओला चारा २५ ते ३० किलो ७५ ते ८० रुपये, पशुखाद्य २ किलो गाईच्या तब्बेतीसाठी तर प्रतिलिटर ८ ते ९ किलो १७६ रुपये आाणि मेडिकल खर्चासाठी १० रुपये असा मिळून २८६ ते २९० रुपये प्रतिदिवस खर्च होत आहे. दुधाचे ३९६ रुपये होतात. त्या शेतकऱ्याची मजुरी वजा जाता फक्त शेणखत शिल्लक राहात असल्याने या भागातील दूध व्यवसाय अडचणीत आला आहे. यासाठी शासनाने खासगी दूध संस्थेवर तसेच त्यांच्या असणाऱ्या पशुखाद्याच्या कारखान्यावर निर्बंध लादून दूधदर सहकारी संस्थेएवढा तर पशुखाद्याचे दर कमी करण्याची मागणी होत आहे.