शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलच्या मॅनेजराला कामगारांकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शिवाजी रोडवरील प्यासा हॉटेलच्या मॅनेजरला किरकोळ कारणावरून कामगारांनी बिअरची बाटली फोडून जखमी केले. हा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शिवाजी रोडवरील प्यासा हॉटेलच्या मॅनेजरला किरकोळ कारणावरून कामगारांनी बिअरची बाटली फोडून जखमी केले. हा प्रकार प्यासा हॉटेलमध्ये ९ मे रोजी रात्री दहा वाजता घडला.

याप्रकरणी सोमनाथ सगर (वय ३३, रा. सुखसागरनगर, कात्रज) यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी बबलु जंगले आणि विशाल पाटील (रा. प्यासा हॉटेल, शुक्रवार पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमनाथ सगर हे हॉटेल प्यासाचे लॉजमध्ये मॅनेजर आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे हॉटेल बंद आहे. तेथील कामगार हॉटेलमध्येच राहतात. सगर व त्यांचे मित्र बलराम व प्रकाश तसेच आरोपी हे रात्री जेवण करीत होते. त्यावेळी बबुल जंगले याने आमचे कामाचे मध्ये का येतो, असे म्हणून शिवीगाळ केली. टेबलावर रिकाम्या बाटली बॉक्समधून बिअरची काचेची बाटली घेऊन ती सगर यांना मारली. विशाल पाटील याने हाताने मारहाण केली. त्यांना सोडविण्यासाठी बलराम व प्रकाश हे आले असताना त्यांनाही शिवीगाळ करुन मध्ये पडायचे नाही, अशी धमकी दिली. बिअरच्या बाटलीची काच सगर यांच्या डाव्या डोळ्याचे खाली लागून ते जखमी झाले आहेत. खडक पोलीस अधिक तपास करीत आहेत.