शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहातील स्वयंपाकगृहे अस्वच्छच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2015 01:40 IST

विद्येचे माहेर असलेल्या पुण्यातील नामांकित शाळा व महाविद्यालयांतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अस्वच्छ स्वयंपाकगृहात शिजविलेले अन्न खाऊनच गुजराण करावी लागत

राहुल शिंदे/सायली जोशी,  पुणेविद्येचे माहेर असलेल्या पुण्यातील नामांकित शाळा व महाविद्यालयांतील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना अस्वच्छ स्वयंपाकगृहात शिजविलेले अन्न खाऊनच गुजराण करावी लागत असल्याचे चित्र समोर आले असून, बहुतेक शाळा-महाविद्यालयांत वॉटर प्युरिफायरच नसल्याने टाकीतून आलेले पाणीच प्यावे लागत असल्याची माहिती ‘लोकमत’ पाहणीतून समोर आली आहे. यामुळे शहरातील वसतिगृहातील मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. सेवासदन संस्थेतील ५१ विद्यार्थिनींना वसतिगृहातील अन्नामुळे विषबाधा झाल्याची घटना समोर आल्यानंतर शिक्षण विभागाने सेवासदन संस्थेला भेट दिली. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना संस्थेच्या वसतिगृहात वॉटर प्युरिफायर बसविले नसल्याची नोंद घेऊन कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ प्रतिनिधींनी हुजूरपागा, पुणे विद्यार्थी गृह, स. प. महाविद्यालय व बीएमसीसी महाविद्यालयातील वसतिगृहातील मुलांच्या मेसमधील स्वयंपाकगृहाची पाहणी केली. त्यात हुजूरपागा वगळता एकाही ठिकाणी वॉटर प्युरिफायर व स्वच्छतेबाबत काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. त्याचप्रमाणे पाण्याच्या टाकीजवळच उरलेले अन्न टाकले जात असल्याचेही आढळले. त्यामुळे पाण्याच्या टाकीजवळचा परिसरही अस्वच्छ दिसला. शैक्षणिक संस्थाचालक कंत्राटदारांकडे सर्व जबाबदारी सोपवून निर्धास्त होतात. मात्र, संस्थाचालकांनी वेळोवेळी वसतिगृहाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.वसतिगृहातील मुलांशी मेसबाबत विचारले असता जेवणाचा दर्जा चांगला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वसतिगृहातील सुमारे ६० ते ७० विद्यार्थीच मेसमध्ये जेवण करत असल्याचेही मेसचालकांनी सांगितले. अस्वच्छतेने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यातपुणे विद्यार्थी गृहाच्या सदाशिव पेठेतील वसतिगृहातील स्वयंपाकगृहात पाल फिरत असल्याचे दिसले. तसेच या ठिकाणी गव्हाचे पीठ उघडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुले खात असलेल्या अन्नाच्या सुरक्षेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच ही खोलीही अतिशय अस्वच्छ असल्याचे दिसले. या ठिकाणी भिंती आणि जमीन अतिशय कळकट होती. भाज्या आणि इतर किराणा सामान ठेवण्यासाठी असलेल्या खोलीतही कचरा होता. या खोलीत मांजरींचाही यथेच्छ वावर होता. भाज्या उघड्या अवस्थेत ठेवलेल्या होत्या. इतकेच नाही तर साठवणीची खोली असताना कचरा टाकण्याच्या टोपल्याही या ठिकाणीच ठेवल्या होत्या. पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी वॉटर प्युरिफायर नसल्याने विद्यार्थ्यांना टाकीत जमा होणारे पाणी प्यावे लागते. या ठिकाणी ५ वी ते १० वीचे २०० विद्यार्थी असून, त्यांच्या आरोग्याबाबत शाळा प्रशासन गंभीर नसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील पदाधिकारी वसतिगृहाला अचानकपणे भेट देऊन वसतिगृहात मेसमध्ये जेवण करतात. त्यामुळे मुलींच्या वसतिगृहात नेहमीच उत्तम जेवण मिळते. मुलांच्या वसतिगृहाबाबत तक्रारी असतील तर त्याबाबत सूचना संबंधितांना दिल्या जातील. मुलांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये, यासाठी ठोस पाऊल उचलले जाईल. - विकास काकतकर, उपाध्यक्ष ,नियामक मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी