शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहावरून पालिकेत गोंधळ

By admin | Updated: August 5, 2014 23:57 IST

शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेकडून मुलींसाठी बांधण्यात येणा:या शारदाबाई पवार वसतिगृहाच्या जागेवरून महापालिकेत गोंधळ सुरू झाला आहे.

पुणो : शहराच्या मध्यवर्ती भागात महापालिकेकडून मुलींसाठी बांधण्यात येणा:या शारदाबाई पवार वसतिगृहाच्या जागेवरून महापालिकेत गोंधळ सुरू झाला आहे. या  वसतिगृहासाठी घोले रस्ता येथे  जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत महापौर चंचला कोद्रे यांनी हे वसतिगृह मुंढवा, हडपसर भागात व्हावे, असा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर केला आपल्या भागाला प्राधान्य दिले असल्याचा आरोप शिवसेना आणि भाजपाच्या स्थायी समिती सदस्यांनी केला आहे. 
तर, हे वसतिगृह मुंढवा येथे 
नसून खडकवासला येथे होणार असल्याचा दावा महापौर चंचला कोद्रे यांनी केला 
आहे. त्यामुळे या गोंधळात आणखीनच भर पडली आहे.
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत महपालिकेच्या वतीने मुलींचे वसतिगृह बांधण्यात येणार होते.  पालिकेच्या चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात  दोन कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष विशाल तांबे यांनी आपल्या बजेटमध्ये शारदाबाई पवार यांच्या नावाने हे मुलींचे वसतिगृह बांधावे, असे सांगितले होते. शहराच्या मध्यवर्ती भागातच हे वसतिगृह असावे, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, घोले रोडला जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत हे वसतिगृह हडपसर येथील मगरपट्टा सिटी येथे उभारावे, असा ठराव दोन आठवडय़ांपूर्वी महापौर कोद्रे यांनी स्थायी समितीकडे दिला होता. त्यानुसार, गेल्या आठवडय़ात यावर प्रशासनाकडून अभिप्राय मागविण्यात आला होता. त्यानुसार, आज स्थायी समितीच्या बैठकीत हे वसतिगृह मुंढवा येथे उभारणार असल्याचे आणि त्यासाठी 8क् लाख रुपयांचे वर्गीकरण मान्य केल्याचे 
स्थायी समिती अध्यक्षांनीही पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे गोंधळात आणखीनच वाढ झाली. मात्र, महापौरांनी 
ही बाब चुकीची असल्याचा दावा 
केला आहे. तसेच, विरोधकांकडून करण्यात आलेले आरोपही चुकीचे असल्याचे 
त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 
आपला प्रस्ताव नवीन वसतिगृहाचा - महापौर 
मगरपट्टा येथे उभारलेले जाणारे मुलींचे वसतिगृह हे दुसरे वसतिगृह आहे. कोद्रे हॉस्पिटलच्या खर्चातील पैसे वर्गीकरणाद्वारे देण्यात आले आहेत, असे महापौर चंचला कोद्रे यांनी स्पष्ट केले. नगरसेवक धंगेकर यांना हा विषय समजलाच नाही. घोले रोड येथे जागा उपलब्ध नसल्याने शारदाबाई पवार मुलींचे वसतिगृह खडकवासला मतदारसंघात करावे, असा ठराव यापूर्वीच पालिकेत करण्यात आलेला आहे. त्यामुळे शारदाबाई पवार वसतिगृह दुसरीकडे बांधण्याचा आरोप चुकीचा आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच, स्थायी समिती अध्यक्षांनाही हा विषय समजला नसल्याचा दावा कोद्रे यांनी केला आहे.