शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयांमध्ये आता ‘धर्मादाय आरोग्यसेवक’

By admin | Updated: July 15, 2016 00:45 IST

शहर आणि जिल्ह्यातील खासगी धर्मादाय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य व गरीब रुग्णांना मोफत, सवलतीचे उपचार मिळवून देण्यासाठी आता शासनाच्याच वतीने या रुग्णालयांमध्ये धर्मादाय

पुणे : शहर आणि जिल्ह्यातील खासगी धर्मादाय रुग्णालयांमध्ये सर्वसामान्य व गरीब रुग्णांना मोफत, सवलतीचे उपचार मिळवून देण्यासाठी आता शासनाच्याच वतीने या रुग्णालयांमध्ये धर्मादाय आरोग्य सेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे आरोग्यसेवक सहधर्मादाय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून काम करणार असल्याची माहिती सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी दिली. लोकमतने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून रुग्णालयांमधील गरीब रुग्णांची हेळसांड मांडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, धर्मादाय आरोग्यसेवकांची आता रुग्णांलयांमध्ये नेमणूक करण्यात येणार आहे.पुणे शहर आणि जिल्ह्यात सुमारे ६४ रुग्णालयांची धर्मादाय रुग्णालय म्हणून नोंद करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील बहुतेक सर्व पंचतारांकित रुग्णालयांचा समावेश आहे. धर्मादाय रुग्णालय म्हणून नोंद असलेल्या या सर्व रुग्णालयांमध्ये गरीब व गरजू रुग्णांना मोफत व पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये उपचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या एकूण उत्पन्नाच्या दोन टक्के निधी या रुग्णालयांनी आयपीएफ फंड म्हणून राखीव ठेवणे आवश्यक आहे. याबाबत येणाऱ्या गरीब रुग्णांना माहिती देण्यासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये स्वतंत्र एमएसडब्ल्यू झालेल्या व्यक्तींची आरोग्य सामाजिक सेवक यांची नियुक्ती करण्याचे बंधनकारक करण्यात आले. त्यानुसार सध्या सर्व रुग्णालयांमध्ये या सामाजिक सेवकांची नियुक्तीदेखील करण्यात आली आहे. नियुक्त केलेले सामाजिक सेवक रुग्णालयाचे कर्मचारी असल्याने येणाऱ्या गरीब रुग्णांना अनेक वेळा उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आवश्यकतेपेक्षा अधिक कागदपत्रांची मागणी करणे, अनेक वेळा ते रुग्णालयामध्ये उपस्थितीतच नसतात, यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांची गैरसोय होते. लोकमतने आवाज उठविल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये शासनाचे धर्मादाय आरोग्यसेवक यांची नियुक्ती करण्याचे ठरविले आहे. यासाठी लवकरच स्वतंत्र भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती कचरे यांनी दिली.