शहरं
Join us  
Trending Stories
1
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
2
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
3
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
4
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
5
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
6
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
7
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
8
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
9
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
10
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
11
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
12
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
13
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
14
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
15
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
16
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
17
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
18
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
19
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
20
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल

हॉस्पिटलला आधाराची ‘सलाइन’

By admin | Updated: June 28, 2017 04:20 IST

येथील तारकेश्वर डोंगराच्या पायथ्याशी पर्णकुटी चौकात गेल्या अकरा वर्षांपासून सुरू असलेले स्वर्गीय राजीव गांधी हॉस्पिटल हे

लोकमत न्यूज नेटवर्कयेरवडा : येथील तारकेश्वर डोंगराच्या पायथ्याशी पर्णकुटी चौकात गेल्या अकरा वर्षांपासून सुरू असलेले स्वर्गीय राजीव गांधी हॉस्पिटल हे सुरुवातीपासूनच आरोग्यविषयक कामकाजाच्या बाबतीत ‘मृत्युशय्ये’वर होते; मात्र महापालिका संचालित संबंधित रुग्णालय चऱ्होली बुद्रुक येथील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील दंत वैद्यकीय महाविद्यालयाला चालविण्यासाठी देण्याच्या करारनाम्यास पाच वर्षांसाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून स्थायी समितीमध्ये दाखल करण्यात आला होता. त्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याने आता येरवड्यातील राजीव गांधी हॉस्पिटलला आधाराची ‘सलाइन’ मिळाली असल्याचे म्हटल्यास फारसे वावगे ठरणार नाही.येरवडा येथे ३० बेडचे पेस्तनजी प्रसूतिगृह आणि बाह्य रुग्णविभाग (ओपीडी) असलेली इमारत अकरा वर्षांपूर्वी जुनाट झाली होती आणि मोडकळीस आली होती. महापालिकेने जुनी इमारत पाडून अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यासाठी सर्वोपचार रुग्णालय बांधण्याचा निर्णय घेतला होता. तत्कालीन स्थानिक नगरसेवक शिवाजी क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सुमारे आठ कोटी रुपयांची तरतूद असलेल्या पाच मजली इमारतीच्या स्व. राजीव गांधी हॉस्पिटलचे उद्घाटन तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते २००७ मध्ये झाले होते. त्यावेळी दिवंगत पर्यटन राज्यमंत्री आणि स्थानिक आमदार अ‍ॅड. चंद्रकांत छाजेड, तत्कालीन महापौर दीप्ती चौधरी उपस्थित होते. येरवडा परिसरातील गोरगरीब, सर्वसामान्य तसेच झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना ससूनच्या धर्तीवर स्व. राजीव गांधी हॉस्पिटल सुरू करण्यात आले.