शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहा लाख रुग्णांवर पालिका रुग्णालयात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2016 04:41 IST

महापालिकेच्या ४० दवाखाने, १५ प्रसूतिगृहांमधून गेल्या ८ महिन्यांत १० लाख ९ हजार रुग्णांनी उपचार घेतला, त्याचबरोबर ७ हजार १७८ रुग्णांवर शहरी गरीब आरोग्य योजनेअंतर्गत मदत करण्यात

पुणे : महापालिकेच्या ४० दवाखाने, १५ प्रसूतिगृहांमधून गेल्या ८ महिन्यांत १० लाख ९ हजार रुग्णांनी उपचार घेतला, त्याचबरोबर ७ हजार १७८ रुग्णांवर शहरी गरीब आरोग्य योजनेअंतर्गत मदत करण्यात आल्याचा लेखाजोखा आरोग्य विभागाने सादर केला आहे.आगामी २०१६-१७ वर्षासाठीचे अंदाजपत्रक तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याअंतर्गत प्रत्येक विभागाकडून त्यांची गेल्या ८ महिन्यातील कामगिरी व त्यांना आगामी वर्षात आवश्यक असलेला निधी यांची माहिती मागवण्यात आला आहे.शहरामध्ये महापालिकेचे ३९ दवाखाने, १५ प्रसूतिगृह, १ मोठे हॉस्पिटल व १ सांसर्गिक रोगांचे रुग्णालय आहे. एप्रिल २०१५ ते नोव्हेंबर २०१५ अखेरपर्यंत ९ लाख ९७ हजार ७६८ रुग्णांनी बाह्यरुग्ण सेवेचा लाभ घेतला. या रुग्णालयांमधून ३ हजार २८९ लहान-मोठ्या स्वरूपाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जननी शिशु सुरक्षा योजनेअंतर्गत ८८२३ मातांनी प्रसूतिपूर्व वैद्यकीय सेवेचा लाभ घेतला. त्यापैकी ३ हजार ४५५ मातांची मोफत प्रसूती करण्यात आली. महापालिकेने महत्त्वाकांक्षी अशी शहरी गरीब योजना सुरू केली आहे. याअंतर्गत गरीब घटकातील रुग्णांना एक लाख रुपयांपर्यंत वैद्यकीय खर्च महापालिकेकडून देण्यात येतो. गेल्या ८ महिन्यात या योजनेअंतर्गत ७ हजार १७८ कुटुंबीयांनी लाभ घेतला आहे. नोव्हेंबरअखेर २०१५ पर्यंत आरोग्य विभागाच्या वतीने विविध प्रकारचे ६३० परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले, तर ११ नवीन परवाने देण्यात आले आहेत. नर्सिंग होमच्या २९३ परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले, तर ८ नवीन नर्सिंग होमला परवाने देण्यात आले. बिबवेवाडी येथे आरोग्य विभागाच्या वतीने सद्गुरू शंकर महाराज हा नवीन दवाखाना सुरू करण्यात आला आहे. २०१५-१६ मध्ये पालिकेच्या वतीने सखाराम कुंडलिक कोद्रे प्रसूतिगृह मुंढवा, दळवी रुग्णालय शिवाजीनगर, राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे ३ ठिकाणी नव्याने सोनोग्राफी केंद्र सुरू करण्यात आले. सध्या पालिकेची ९ सोनोग्राफी केंद्रे कार्यरत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने गणेश पेठ येथे जुने मासळी मार्केट पाडून नवे मासळी मार्केट उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे, याकरिता केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मत्सिकी विकास महामंडळाकडून अडीच कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहेत. या मासळी मार्केटमध्ये गाळाधारकांना आरोग्यदृष्ट्या सर्व सोयी-सुविधा, कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.