शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खेडवासीयांच्या आशा पल्लवीत

By admin | Updated: July 16, 2017 03:41 IST

पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेले राजकीय, शासकीय ग्रहण अद्यापही सुरू आहे. जागा शोधण्याच्या शर्थीच्या प्रयत्नात विकासाच्या

- लोकमत न्यूज नेटवर्कशिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागलेले राजकीय, शासकीय ग्रहण अद्यापही सुरू आहे. जागा शोधण्याच्या शर्थीच्या प्रयत्नात विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्याचा मानाचा तुरा मानले जाणाऱ्या विमानतळाची दिशा पुन्हा एकदा खेड-शिरूर भागात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. चाकण किंवा खेड-शिरूर भागात विमानतळ होणे अपेक्षित होते. त्या दृष्टीने मागील तीन-चार वर्षांत सर्वेक्षणही करण्यात आले होते. चाकण, भोसरी, खेड, रांजणगाव, शिक्रापूर, सणसवाडी, पिंपरी-चिंचवड या राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्याला या विमानतळाचा फायदा झाला असता. त्याचबरोबर मुंबई-नाशिकला जवळ असे, या भागातील विमानतळ ठरले असते. त्यादृष्टीने विमानतळाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. परंतु राजकीय व शासकीय उदासीनतेची ‘माशी शिंकली’ आणि या भागातील आंतरराष्ट्रीय विमानतळ तांत्रिक अडथळ््याचे कारण देत पुरंदर येथे होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आता पुन्हा एकदा खेड ‘सेझ’ भागात विमानतळ होईल, अशी अपेक्षा राजकीय व शासकीय पातळीवर व्यक्त होत आहे. या भागातील ‘सेझ’ संपादित जमिनीत आंतरराष्ट्रीय विमानतळाचा सर्व्हे २०१५ मध्ये झाला आहे. त्यातील त्रुटी दूर झाल्यास पुन्हा एकदा विमानतळाची दिशा बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चाकणजवळील सातगावात सुरुवातीला विमानतळासाठी सर्वेक्षण झाले. त्यानंतर सप्टेंबर २०१५ मध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाने चाकणऐवजी दुसरी जागा शोधण्याची सूचना केली. केंदूर, निमगाव, दावडी, कन्हेरसर या भागातील काही जागेचा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सर्व्हे करण्यात आला होता.विमानतळ आले तर लोकांच्याच हिताचे : सुरेश गोरेखेड विभागामध्ये विमानतळ येण्याबाबत सध्या तरी कुठलाही निर्णय झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे मात्र लोकांच्या आशा आकांक्षा पुन्हा एकदा उंचावल्या आहेत, हे खरे. जर विमानतळ खेडमध्ये आले तर चांगलेच आहे. ते लोकांच्या हिताचेच ठरेल. परंतु त्यासाठी लोकांची जमीन देण्याची तयारी असायला हवी. खेडमध्ये आता जी जमिन शिल्लक आहे त्यामध्ये विमानतळ होऊ शकते का हे पाहावे लागेल. परंतु विमानतळ होण्यासाठी जनमताचा रेटा मात्र लागेल. सेझ, विमानतळ, रेल्वेच्या गाजराने गुंतवणूकदार हैराणमागील आठ वर्षांत खेड व शिरूर भागात सेझचे १७ गावांपैकी पहिल्या टप्प्यात ५ गावांत संपादन झाले. त्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी या भागात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यातच विमानतळ व नंतर रेल्वेच्या सर्व्हेनंतर खेड व शिरूर भागात कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक जमीन खरेदी विक्रीत झाली. परंतु अचानक रात्रीतून विमानतळ व रेल्वे दुसरीकडे गेल्याने गुंतवणूकदारांच्या झोपा उडाल्या आहेत. या भागातील विकासाला मोठी खीळ बसली आहे. पुन्हा एकदा विमानतळाच्या चर्चेने या भागात दिलासा मिळाला असून सेझ, विमानतळ, रेल्वेचे गाजर मात्र सर्वांचेच हृदयाचे ठोके चुकवत आहे.