शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’च्या जन्माचे स्वागत करणा-यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:16 IST

जुनी जेजुरी येथे बळीराजापूजन, शेतकरी सन्मान, औजारपूजन, सफाई कामगार महिलांना साडीचोळी-मठाई वाटप आदी कार्यक्रमांसह कन्याजन्माचे स्वागत करण्यासाठी मुलींच्या नावे मुदतठेव करून त्यांच्या माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला.

जेजुरी : जुनी जेजुरी येथे बळीराजापूजन, शेतकरी सन्मान, औजारपूजन, सफाई कामगार महिलांना साडीचोळी-मठाई वाटप आदी कार्यक्रमांसह कन्याजन्माचे स्वागत करण्यासाठी मुलींच्या नावे मुदतठेव करून त्यांच्या माता-पित्यांचा सत्कार करण्यात आला. बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठान जेजुरी यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. बलिप्रतिपदेनिमित्त दरवर्षी बल्लाळेश्वर विकास प्रतिष्ठानच्या बळीराजा, औजारपूजनासह, विविध समाजाभिमुख कार्यक्रम राबविण्यात येतात.या उपक्रमाचे यंदाचे नववे वर्ष असून, सालाबादप्रमाणे यंदाही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप बारभाई, वारकरी संप्रदायातील हभप दशरथतात्या जगताप यांच्या हस्ते शेती औजार व बळीराजापूजन करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष एन.डी. जगताप, नगरसेविका सविता जगताप, साधना लाखे, मंगल दोडके, अजयसिंह सावंत, डॉ. विनोदकुमार सिंह, संपत कोळेकर, सर्जेराव कदम, राजेश पाटील, पांडुरंग सोनवणे, आनंद नाईक, आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच कन्याजन्माचे स्वागत करणा-या १५ दाम्पत्यांचा सत्कार करून त्यांच्या कन्येच्या नावे बल्लाळेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने मुदतठेव करून त्याची पावती दाम्पत्यांच्या हाती देण्यात आली. शहरातील स्वच्छता महिला कामगारांना साडीचोळी व मिठाईवाटप करण्यात आले. प्रास्ताविक संदीप जगताप यांनी केले तर सूत्रसंचालन तानाजी जगताप, आयोजन शिवाजी जगताप, अजय जगताप, मोहन भोसले, छबन कामथे, महेश उबाळे, आदींनी केले.