ग्रामविकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींना विविध करवसुलीच्या माध्यमातून मिळणारे आर्थिक उत्पन्न हे त्या ग्रामपंचायतीच्या विकासाचा भक्कम आधार असून, गावच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी वेळोवेळी घरपट्टी, पाणीपट्टी असे विविध कर भरून सहकार्य करणे गरजेचे असल्याचे या वेळी गटविकास अधिकारी येळे यांनी सांगितले. शंभर टक्के करवसुली करणारी दौंड तालुक्यात पहिलीच ग्रामपंचायत ठरल्याबद्दल सरपंच अनिता बोरावणे, ग्रामसेविका विशाखा लेंडघर,कर्मचारी रघुनाथ भांड यांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी विस्ताराधिकारी बाबा मुलाणी,विद्याधर ताकवणे,संतोष लेंडे,नाना ठोंबरे,प्रकाश बोरावणे,शहाजी कुलाळ,अक्षय मखर,भरत कांबळे,नानासाहेब विश्वासे,हनुमंत बोरावणे,नारायण बोरावणे,महेंद्र बोरावणे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
110921\img-20210909-wa0022.jpg
सोबत फोटो.
पानवली (ता.दौंड) येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा शंभर टक्के कर वसुली निमित्त गटविकास अधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.