शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील डेव्हिस करंडक लढतीचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 03:14 IST

आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या वतीने पुण्यातील डेव्हिस करंडक लढतीच्या आयोजनाला लक्षवेधी आयोजनाचा पुरस्कार लाभला आहे.

पुणे : आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या वतीने पुण्यातील डेव्हिस करंडक लढतीच्या आयोजनाला लक्षवेधी आयोजनाचा पुरस्कार लाभला आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या रेकग्नायझेशन अँड रिवॉर्ड (आर अँड आर) समितीने गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.यावर्षी फेब्रुवारीमध्ये पुण्यात म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आशिया-ओशियाना गट १ मधील भारत वि. न्यूझीलंड या लढतीचे आयोजन करण्यात आले होते. लढत यशस्वी करण्यासाठी राज्य टेनिस संघटना आणि आयोजक असणाºया पुण्याच्या संघटकांनी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळे हा सन्मान मिळाला असल्याचे ‘आर अँड आर’ समितीने भारतीय टेनिस महासंघाला कळवले आहे. या सन्मानासाठी लढतीच्या आयोजनाच्या अनुषंगाने येणाºया सर्व बाबींचा विचार करण्यात येतो. पुण्याच्या सहकार्याने राज्य टेनिस संघटनेने ही लढत यशस्वी करण्यासाठी अनेक वेगळे उपक्रम राबवले होते. यामध्ये त्यांनी उदयोन्मुख खेळाडूंसाठी विशेष क्लिनिकचे आयोजन केले होते. प्रेक्षकांसाठी खास बक्षिसे ठेवली होती. त्यांच्यासाठी अल्पोपाहारही ठेवण्यात आला होता. विशेषकरून लढतीच्या ‘ड्रॉ’च्या दिवशी खेळाडूंना केंद्रावर आणण्यासाठी साकारलेली मिरवणुकीची कल्पना तर या सगळ्याचा सर्वोच्च बिंदू ठरली. आतापर्यंत खेळाडूंचे अशा पद्धतीने कधीच स्वागत करण्यात आले नव्हते. टेनिस खेळाला लोकप्रिय करण्यासाठी केलेले हे सगळे प्रयत्न सन्मानासाठी पात्र ठरतात. म्हणूनच या लढतीची आम्ही लक्षवेधी लढत म्हणून निवड केल्याचे ‘आर अँड आर’ या समितीने नमूद केले आहे.राज्य टेनिस संघटनेचे अध्यक्ष भरत ओझा आणि सचिव सुंदर अय्यर यांनी या सन्मानाने आमचा आत्मविश्वास उंचावल्याचे मत व्यक्त केले. सुंदर अय्यर म्हणाले, ‘‘भविष्यात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यापेक्षा अधिक आकर्षकपणे आयोजन करण्यासाठी आम्हाला या सन्मानाने प्रेरणा मिळाली आहे. राज्यातील टेनिसच्या प्रसारासही याचा फायदा होईल. महाराष्ट्र सरकार, राष्ट्रीय टेनिस संघटना, राज्य टेनिस संघटना, आश्रयदात्या अमृता फडणवीस, संयोजन समितीचे कार्याध्यक्ष नितीन करीर, संयोजन सचिव प्रशांत सुतार, क्रीडा संचालनालयाचे पदाधिकारी, पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका या प्रत्येकाकडून आम्हाला भक्कम पाठिंबा मिळाला. त्यामुळेच डेव्हिस करंडक लढतीचे पुण्यात ४३ वर्षांनी यशस्वी आयोजन करू शकलो.’’