शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

घरांना स्थळकाळानुरूप बांधकाम साहित्य वापरावे

By admin | Updated: January 23, 2017 02:18 IST

पूर्वी माहिती, तंत्रज्ञान, वाहूतक व पैशांच्याअभावी, तसेच संरक्षणाच्या दृष्टीने शक्यतो गावातच स्थानिक दगड, माती, भेंडे किंवा विटांच्या जोड

पूर्वी माहिती, तंत्रज्ञान, वाहूतक व पैशांच्याअभावी, तसेच संरक्षणाच्या दृष्टीने शक्यतो गावातच स्थानिक दगड, माती, भेंडे किंवा विटांच्या जोड भिंती बांधून, छतासाठी हवामानानुसार लाकडांवर पांढऱ्या मातीचा पेंड, कौल टाकावू वैरण, गवत, सरमाड, काड, पऱ्हाटीची ताटे, वृक्षांच्या फांद्या वापरत व बहुदा घरचेच मजूर व अर्धकुशल गवंड्यांकडून घरे बांधली जात. त्यामुळे त्यांचा खर्चतर कमी असेच, पण कोणत्याही ऋतूत ते पर्यावरण पुरकही असत. जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने गावाबाहेर शेतात शक्यतो दगडांच्या पवळी रचून त्यावर लाकूड व पाला-पाचोळ्यांचे छप्पर करून संरक्षणासाठी कडेने दगडांच्या पवळी किंवा बाभळीच्या काट्या लावून एकच रस्ता ठेवत. तो काट्यांच्याच झोप्याने बंद करत. पण अलीकडे लोकसंख्या, बागायत, संरक्षण, बांधकाम साहित्य, वाहतूक, माहिती तंत्रज्ञान व पैरण वाढत गेल्याने सोयीच्या दृष्टीने थोडे दूर शेतात वेगळे बांधकाम साहित्य वापरून घरे तयार होऊ लागली. सधन लोकांनी वारेमाप खर्च करून जरी मोठी घरी बांधली असली, तरी अलीकडे हवामान, शेतमालाच्या किमती, सरकारी धोरणे वारंवार बदलत असल्याने काढून त्याच जाड मजबूत भिंतीवर टी अँगल फरशी किंवा स्लॅब टाकता येतो व तोच पत्रा किंवा कौल लाकडी किंवा लोखंडी फ्रेमसह वरच्या मतल्यासाठी वापरला तर जागेची व पैशांची तर बचत होतेच; पण स्लॅबवर मजला झाल्याने खालचे घर तापत नाही. पावसात गळत नाही. त्यावर थोडी गच्ची सोडून त्यावर वाळवणे उन्हाळ्यात हवेशीर झोपणे, उन्हाळी कामे करणे, गप्पा मारणे, बैठका यासाठी वरून सर्व परिसर व शेत दृष्टिक्षेपात येत असल्याने संरक्षणही चांगले होते किंवा कालांतराणे घराची जागाच बदलायची झाली, तरी दुसरीकडे वीट व स्लॅब बांधकामाप्रमाणे हे साहित्य वाया न जाता उचलून दुसरीकडे नेता येते. त्यातून घर विहिरी, मोठे कंपाउंट बांधता येतात. सुरवातीला जास्त पैसे नसतील, तर पहिल्या टप्प्यात जमिनीचा परवर मुरूम टाकून ठोकून घ्यावा व त्यावर घासलेली शहाबादी फरशी टाकावी. किंवा रंग टाकून सिमेंटचा कोबा करावा. पुढे थोडीजरी ऐपत वाढली तरी त्यावर हव्या त्या रंगाची डिझाईनची कमी खर्चातील प्लॅस्टिक मॅट टाकली, तर कमी खर्चात घर आकर्षक तर दिसतोच; पण ते हिवाळ्यात फार थंडही पडत नाही. व उन्हाळ्यात अंथरूण न टाकता त्यावर बसता किंवा झोपता येते. घरात लहान मुले असतील तर ते फारच उत्तम असते. एकदा टाकलेली मॅट ५-६ वर्ष वापरून हळूच काढली तर तिचा उपयोग वाळवण, पावसात झाकण टाकण्यासाठी होतो. कमी खर्चात पुन्हा नवीन डिझाईनची आकर्षक मॅट टाकून नवीन परवर केल्याचे समाधान मिळते. शेतीत कधी आर्थिक फटका बसेल व योजलेल्या कामांचे इमले कोसळतील हे सांगता येत नसल्याने सामान्य शेतकऱ्याने ऐपत नसताना ‘रिन काढून सण’ या म्हणीप्रमाणे एकदम चांगलेच बांधकाम साहित्य वापरून मोठे घर बांधण्यापेक्षा स्थळ काळानुरूप बांधकाम साहित्य वापरून टप्प्याटप्प्याने घर सुधारणा करत गेले तर एकदम ताण येणार नाही.प्रथम जास्त पैसे नसतील तर अशा घरांवरही तूर्त कौल किंवा पत्रा टाकावा व आतून त्याला सिलिंग करावे. म्हणजे घर तापणार नाही. पुढे ऐपत आल्यावर तोच पत्रा पुढे चांगला हळू हळू शेतकऱ्याची ऐपत वाढत गेली तर गरजेनुसार त्या घराला व्हरांडा, चांगली फरशी, चांगले कंपाउंड, पी.ओ.पी. करता येते. पण प्रथमच ऐपत नसताना दुसऱ्याने गळ्यात सोन्याची सरी घातली म्हणून आपण आजच निदान दोरी तरी बांधावी या वृत्तीतून तीच दोरी कधी गळ्यातला फास होईल हे सांगता येत नसल्याने शेतकऱ्यांनी ऐपतीनुसार स्थळकाळ परत्वे बांधकाम साहित्य वापरून तूर्त घर बांधावे व पुढे गरजेनुसार त्याचा विस्तार करावा.