शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सुटीचा दिवस बँकेच्या दारात

By admin | Updated: November 14, 2016 03:02 IST

रविवार सुटीचा दिवस, चाकरमान्यांना नोटा बदलून घेण्यात गेला. बँकांसमोर रांगाच रांगा दिसून आल्या. हजार आणि पाचशेच्या नोटा व्यवहारातून बंद केल्यामुळे

पिंपरी : रविवार सुटीचा दिवस, चाकरमान्यांना नोटा बदलून घेण्यात गेला. बँकांसमोर रांगाच रांगा दिसून आल्या. हजार आणि पाचशेच्या नोटा व्यवहारातून बंद केल्यामुळे सामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जुन्या नोटा बाजारातील व्यापारी घेण्यास नकार देत असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. तिसऱ्या दिवशीही एटीएम यंत्रणा विस्कळीत झाली होती. केंद्र सरकारने शनिवार आणि रविवार बँका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शनिवारप्रमाणेच चाकरमान्यांना रविवारची सुटी बँकेच्या रांगेत घालवावी लागली. ग्राहकांनी सकाळी सातपासून बँकांच्या बाहेर रांगा लावल्या आहेत. आजची गर्दी अधिक होती. शहरातील बँकांमध्ये ग्राहकांना नोटा बदलून देण्यासाठी आणि बँकेतून पैसे काढण्यासाठी रांगाच रांगा दिसत होत्या. त्यात तरुण, महिला आणि वयोवृद्धही दिसून आले. चाकरमान्यांना आज सुटी असल्याने रोजच्या व्यवहारासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी हे चाकरमानी बँकेच्या रांगेत उभे आहेत. त्यामुळे त्यांची आजची सुटी बँकेच्या रांगेतच जाणार आहे. व्यवहार करण्यासाठी नागरिकांकडे पैसे नसल्याने आणि बँकेत तेवढ्या प्रमाणात रक्कम उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दोन-चार दिवसांत व्यवहार सुरळीत होतील, असे सरकारकडून सांगितले. मात्र, सरकारचे हे नियोजन फसल्याचे दिसून आले. बँकेतच शंभर आणि पन्नासच्या नोटा उपलब्ध नाहीत. त्यामुळे एटीएममध्ये कुठून येणार? शहरातील ठरावीक बँकांचे एटीएमस सुरू आहेत. त्या ठिकाणीही पैसे काढण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत. एटीएममधून फक्त दोन हजार रुपये निघत असल्यामुळे या दोन हजारांसाठी नागरिकांना आपला कामधंदा सोडून रांगेत उभे राहावे लागत आहे. सकाळी आठपासून बिजलीनगर, चिंचवड येथील कॅनरा बँकेच्या एटीएमसमोर गर्दी झाली होती. तसेच प्राधिकरणातील भेळ चौकातील एचडीएफसी बँकेसमोरही नऊपासूनच गर्दी झाली होती. निगडी येथील युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी नागरिकांनी सकाळी आठपासून रांगा लावल्या आहेत. मोरवाडी येथील बँक आॅफ महाराष्ट्रच्या शाखेत पैसे काढणाऱ्यांची रांग सेंट्रल मॉलपर्यंत पोहचली आहे. सर्व कामकाज सोडून बँकेत पैसे काढण्यासाठी जात आहेत. पैसे नसल्याने सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुटीचा दिवस पैसे बदलून घेण्यात गेला. तसेच एटीएममध्ये दुपारनंतर खडखडाट झाला. (प्रतिनिधी)