शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘पानशेत’च्या इतिहासातून धडा मिळेल

By admin | Updated: July 13, 2016 00:25 IST

पानशेत पूरग्रस्तांचा लढा, उभारण्यात आलेले जनआंदोलन, पुनर्वसनासाठी केलेला संघर्ष या सर्व गोष्टींमधून पानशेत पूराचा संपूर्ण इतिहास ‘कहाणी पानशेत पूरग्रस्तांची’ यामध्ये कथन झाला आहे.

पुणे : पानशेत पूरग्रस्तांचा लढा, उभारण्यात आलेले जनआंदोलन, पुनर्वसनासाठी केलेला संघर्ष या सर्व गोष्टींमधून पानशेत पूराचा संपूर्ण इतिहास ‘कहाणी पानशेत पूरग्रस्तांची’ यामध्ये कथन झाला आहे. त्यामुळे या पुस्तकाचा एखाद्या पाठ्यपुस्तकाप्रमाणे उपयोग होईल आणि त्यातून सगळे धडा घेतील, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.पानशेत धरण फुटून आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या पुरग्रस्तांच्या समस्या व त्याच्या निराकरणासाठी केलेले प्रयत्न, पाठपुरावा या सर्वांची माहिती देणारे मंगेश खराटे लिखित ‘कहाणी पानशेत पूरग्रस्तांची’ या पुस्तकाचे प्रकाशन चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते.आमदार मेधा कुलकर्णी, राज्याचे माजी मदत व पुनर्वसन मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार मोहन जोशी, उपमहापौर मुकारी अलगुडे, शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, माजी महापौर अंकुश काकडे, माजी नगरसेवक शिवराम मेंगाळे व लेखक मंगेश खराटे आदी उपस्थित होते. बाळासाहेब शिवरकर आणि डॉ. पतंगराव कदम यांनी राजकीय गुपित खोलत हास्याची फटकेबाजी केली. सत्ता कुणाचीही असो, सहज असे काहीच होत नाही. वरिष्ठ असूनही मलाही हातात फाईल घेऊन फिरावे लागले होते, अशी मिश्किल टिप्पणी कदम यांनी केली. सत्ताधारी पक्षाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनाही त्यांनी भाषणात शाब्दिक चिमटा काढला. मंगेश खराटे यांचा व्यवसाय खाटीकाचा. या आपल्या बंधूकडे त्या अधूनमधून जात असतं असे म्हणाले. मटणाचा खिमा मंगेश करतो, यावरून तुम्हीच आता समजून घ्या, असे त्यांनी सांगताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. मंगेश वाघमारे यांनी सूत्रसंचालनकेले. (प्रतिनिधी)