शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

व्यंगचित्रातून इतिहास घडू शकतो

By admin | Updated: November 25, 2015 00:44 IST

चित्रकलेत व्यंगचित्रांना महत्त्वाचे स्थान आहे. व्यंगचित्रातून इतिहासही घडू शकतो, असे मत यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्ते केले.

पुणे : चित्रकलेत व्यंगचित्रांना महत्त्वाचे स्थान आहे. व्यंगचित्रातून इतिहासही घडू शकतो, असे मत यंदाचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्ते केले. सरस्वती लायब्ररी व साहित्यवेध प्रतिष्ठान पुणे तर्फे सुरेश लोटलीकर यांच्या कुंचल्यातून साकार झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व ८९ अध्यक्षांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन बालगंधर्व कलादान येथे भरविण्यात आले आहे. प्रर्दशन उद्घाटनच्या प्रसंगी डॉ. सबनीस बोलत होते. यावेळी डॉ. सबनीस यांच्या हस्ते अर्कचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच डॉ सबनीस यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल यंदाचे अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष पी.डी. पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी, अ.भा. मराठी साहित्य संमेलन २०१५ चे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, सुरेश लोटलीकर, कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, एमआयटी पुणेचे प्रकाश जोशी, स्थायी समिती अध्यक्ष श्याम देशपांडे, कैलास भिंगारे उपस्थित होते. डॉ सबनीस म्हणाले, व्यंगचित्रातून इतिहास घडू शकतो. बाळासाहेबांच्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून शिवसेनेचा जन्म झाला. तसेच व्यंगचित्रे पाहिल्यानंतर रसिकांच्या मनात गुदगूली झाली पाहिजे. आणि अशी गुदगुली बाळासोहब व आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रातून अनुभवायला मिळते.८८वे अखिल भारतीय साहित्य संमेलन महाराष्ट्राबोहर आयोजित केल्यामुळे वेगवेगळ््या लोकांनी विरोध दर्शवला होता. परंतू आगामी साहित्य संमेलन हे फक्त आर्थिक अंगाने भव्यदिव्य होणार नसून सात्विकतेने व नैतिकतेने भव्यदिव्य होणार आहे. तसेच संमेलनातून येणारा संपूर्ण निधी दुष्काळ ग्रस्तांना देणार असल्याची माहिती सबनीस यांनी दिली. डॉ मोरे म्हणाले, साहित्य संमेलन हा एक गाडा आहे. (प्रतिनिधी)