शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

इतिहासकारांचे वारकरी संप्रदायाकडे दुर्लक्ष : माधव भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 17:38 IST

अभ्यासाच्या चौकटीत बसत नाही म्हणून प्रस्थापित इतिहासकारांनी पंढरपूर, वारी आणि वारकरी संप्रदायाकडे दुर्लक्ष केले....

पुणे : महाराष्ट्रातील वारकरी परंपरेचा आजतागायत कधीच विस्ताराने अभ्यास करण्यात आला नाही. पंढरपूरची वारी ९०० वर्षे सुरू आहे. इतकी वर्षे झाली तरी त्याच श्रद्धा आणि निष्ठेने हजारो लोक वारीत येतात हे वारीचे अफाट यश आहे. आपल्या अभ्यासाच्या चौकटीत बसत नाही म्हणून प्रस्थापित इतिहासकारांनी पंढरपूर, वारी आणि वारकरी संप्रदायाकडे दुर्लक्ष केले, अशी खंत महाराष्ट्र राज्य पुनर्वसन समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी व्यक्त केली.उत्कर्ष प्रकाशनतर्फे वा. ल. मंजूळ यांच्या ‘श्री विठ्ठल आणि क्षेत्र पंढरपूर’ या पुस्तकाचे प्रकाशन भंडारी यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ अभ्यसक डॉ. गो. बं. देगलूरकर, ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे आणि प्रकाशक सु. वा. जोशी उपस्थित होते. देगलूरकर म्हणाले,‘मूर्तिशास्त्राप्रमाणे तिरुपती बालाजीची मूर्ती ही भोग मूर्ती आहे. मारुती आणि महिषासूर मर्दिनी ही वीर मूर्ती, तर  विट्ठल ही योग मूर्ती आहे. विठ्ठल जसा आहे तसा तो प्रत्येकाला दिसत नाही, हेच या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे. शैव आणि वैष्णव पंथाला एकत्र आणणाऱ्या विठ्ठलाला ‘हरिहर’ म्हणतात. डोक्यावर शिवलिंग असल्याने विठ्ठल हा हर वाटतो. अनुत्तीर्ण मुलाला आपण उपरोधाने शंख म्हणतो. पण, विठ्ठलाच्या हातातील शंख हे ज्ञानाचे प्रतीक आहे. काहींच्या मते विठ्ठल हा पितांबरधारी तर काहींच्या मते दिगंबर आहे. धोतराचा सोगा स्पष्टपणे दिसतो. शिल्पकाराच्या कौशल्यामुळे मूर्ती श्वेतांबर असूनही दिगंबर वाटते. विठ्ठलाती मूर्ती प्रत्येकाला दिसते, पण ती कळते असे होत नाही.’ ढेरे म्हणाल्या, ‘ मंजूळ यांच्याकडे ग्रंथाचे मोल जाणण्याचे ज्ञान व चिकित्सक वृत्ती आहे. आपल्या गावाची महत्त्वाची स्थाने, मोठया व्यक्तींची घरे यासह प्रत्येकाची गावाशी नाळ जुळणे गरजेचे आहे. पूजेचे नैमित्तिक उपचार, भक्त आणि भाविकता, अन्य प्रांतातील विठ्ठल भक्ती, परंपरा या माध्यमातून जिवंत देव आपल्याला या पुस्तकातून भेटतो. सात शतकांच्या महाराष्ट्राचा भावकोश या दैवताने जागविला.’सु. वा.जोशी यांनी प्रास्ताविक केले. दीपक करंदीकर यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेPandharpurपंढरपूरAruna Dhereअरुणा ढेरे