शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडतीत मातब्बरांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:29 IST

घोडेगाव: आंबेगाव तालुक्यातील १०५ ग्रामपंचातींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत झाली. यामध्ये मंचर ग्रामपंचायत अनुसूचीत जाती महिला तर घोडेगाव ग्रामपंचायत ...

घोडेगाव: आंबेगाव तालुक्यातील १०५ ग्रामपंचातींच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत झाली. यामध्ये मंचर ग्रामपंचायत अनुसूचीत जाती महिला तर घोडेगाव ग्रामपंचायत अनुसूचीत जमाती महिला आल्याने मात्तबरांचा हिरमोड झाला.

आंबेगाव तालुका पंचायत समिती मध्ये तहसिलदार रमा जोशी यांनी आरक्षण सोडत घेतली. यावेळी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पंचायत समिती सभापती संजय गवारी, उपसभापती संतोष भोर, माजी उपसभापती नंदकुमार सोनावले, सोमनाथ काळे, विजय आढारी, खंडु खंडागळे इत्यादी पदाधिकारी व विविध गावांचे ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आराध्य गणेश पवार या मुलाच्या हस्ते चिठ्ठया काढण्यात आल्या.

दरम्यान, घोडेगाव ग्रामपंचायत मध्ये २००७ पासून महिला आरक्षण निघत असून आजच्या आरक्षण सोडती मध्ये सर्वसाधारण आरक्षण यायला पाहिजे होते. आरक्षण सोडतीमध्ये मागील तीन निवडणूकांच्या आरक्षणाचा विचार केला गेला. यामध्ये सन २०१२ मधिल निवडणूकीत घोडेगाव ग्रामपंचायतमध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण असताना निवडणूक विभागाच्या दप्तरी सर्वसाधारण आरक्षणाचा चुकीचा उल्लेख आहे. तरी घोडेगावचे आरक्षण बदलावे अशी सर्व पक्षिय मागणी आरक्षण सोडतीत सोमनाथ काळे, तुकाराम काळे, नंदकुमार बो-हाडे, मिलींद काळे, सुनिल इंदोरे, लखन घोडेकर इत्यादींनी केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी च तहसिलदार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे यांनी सांगितले.

पडलेले आरक्षण व गावे खालीलप्रमाणे

सर्वसाधारण

कोलदरा/गोनवडी, कुरवंडी, निरगुडसर, नागापुर, भागडी, खडकी, वडगांव काशिंबेग, काठापुर, पेठ, कोळवाडी/कोटमदरा, देवगांव, मेंगडेवाडी, शेवाळवाडी, भराडी, वडगांव पीर, थोरांदळे, लोणी, साकोरे, रानमळा

सर्वसाधारण महिला

ठाकरवाडी, टाकेवाडी, वाळुंजनगर, निघोटवाडी, चिंचोडी, आंबेगाव गावठाण, महाळुंगे पडवळ, अवसरी बुद्रूक, पारगांव तर्फे खेड, नारोडी, रांजणी, पारगांव तर्फे अवसरी बुद्रूक, कारेगाव, गिरवली, पोंदेवाडी, चिंचोली, धामणी, खडकवाडी, जाधववाडी, शिरदाळे

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)

चास, पहाडदरा, लांडेवाडी/पिंगळवाडी, तळेकरवाडी, कळंब, लाखणगांव, गावडेवाडी, अवसरी खुर्द, विठ्ठलवाडी,

नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी)महिला

नांदुर, जवळे, लौकी, भावडी, धोंडमाळ/शिंदेवाडी, पिंपळगांव तर्फे महाळुंगे, मांदळेवाडी, टाव्हरेवाडी, तांबडेमळा,

अनुसूचीत जाती (एससी) सर्वसाधारण

वळती

अनुसूचीत जाती (एससी) महिला

काळेवाडी/दरेकरवाडी, मंचर

अनुसूचीत जमाती (एसटी) सर्वसाधारण

चिखली, साल, बोरघर, गोहे बुदू्रक, फलौंदे, पाटण, सुपेधर, महाळुंगे तर्फे घोडा, फुलवडे, डिंभे बुद्रूक, पोखरी, राजपुर, ढाकाळे, आसाणे, तिरपाड, शिनोली, माळीण, उगलेवाडी/फदालेवाडी या १८ आदिावासी क्षेत्रातील तर चांडोली खुर्द, चांडोली बुद्रूक, शिंगवे या तीन बिगर आदिवासी क्षेत्रातील

अनुसूचीत जमाती (एसटी)महिला

पिंपरगणे, कुशिरे बुद्रूक, कोलतावडे, आहुपे, जांभोरी, तळेघर, कानसे, गोहे खुर्द, डिंभे खुर्द, आंबेदरा, आमोंडी, गंगापुर खुर्द, पांचाळे बुद्रूक, चपटेवाडी, राजेवाडी, पिंपळगांव तर्फे घोडा, गंगापुर बुद्रूक, कोंढवळ या १८ आदिावासी क्षेत्रातील तर या घोडेगाव, एकलहरे, थुगांव, जारकरवाडी चा बिगर आदिवासी क्षेत्रातील

सरपंच आरक्षण सोडतीत चिठ्ठी काढताना आराध्य पवार.

08122020-ghod-02 -