शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

हिंजवडीची फुटणार कोंडी

By admin | Updated: December 24, 2015 00:46 IST

हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञाननगरीतील वाहतूककोंडीसंदर्भात मागील महिन्यात ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती.

पिंपरी : हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञाननगरीतील वाहतूककोंडीसंदर्भात मागील महिन्यात ‘लोकमत’ने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. याचा संदर्भ देत चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी विधिमंडळात वाहतूक प्रश्नाबाबत लक्षवेधी मांडली. त्यानुसार हिंजवडी आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक प्रश्न सोडविण्याचे आश्वासन सभागृहाने दिले. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि हिंजवडी ते म्हाळुंगे या रस्त्याच्या कामाला गती देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे वर्षानुवर्षे होणाऱ्याा वाहतूककोंडीच्या त्रासापासून अभियंत्यांना सुस्कारा मिळणार आहे.हिंजवडी, माण, मारुंजी परिसरात माहिती तंत्रज्ञाननगरी विकसित झाली आहे. आयटी पार्कमधील टप्पा तीनमधील मेक इंन इंडिया या उप़क़्रमांतर्गत झालेल्या एका प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट यांनी वाहतूक प्रश्नाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. नियोजनाच्या अभावाने या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा अनुभवही सांगितला होता. या संदर्भात ‘लोकमत’ने मागील महिन्यात सलग आठवडाभर वृत्तमालिका प्रकाशित केली. ‘पाच महिन्यांसाठी लागतो तास, अग्निशामक विभागाचा कारभार एका चालकावर, अधिकारी आणि माफियांमुळे भूसपांदनास खोडा, सदोष भूसपांदन कारवाईमुळे विकास रखडला,’ असे विविध विषय मांडले होते. विकास आराखड्यानुसार रखडलेले रस्ते, सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेला चुकीचा पूल, वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना, रखडलेला टप्पा दोन ते म्हाळुंगे बालेवाडी रस्ता अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला होता. विकासात होणारे राजकारण आणि ढिम्म प्रशासनामुळे आयटी पार्कचा विकास कसा रखडला आहे, यावर लक्ष वेधले होते. तसेच या भागातील शेतकरी, उद्योजकांनी आणि आयटी पार्कमधील कामगारांनी नाराजी व्यक्त केली होती. जगताप यांनी लक्षवेधीही मांडली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)