शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामात अडथळा; महिलांवर गुन्हा दाखल

By admin | Updated: May 8, 2017 02:00 IST

चासकमान कालव्यातून पाणी चोरल्याप्रकरणी जातेगाव खुर्दचे माजी सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची घटना तसेच

लोकमत न्यूज नेटवर्ककेंदूर : चासकमान कालव्यातून पाणी चोरल्याप्रकरणी जातेगाव खुर्दचे माजी सरपंच यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची घटना तसेच कालव्यातून गेटची मोडतोड करत पाणी चोरल्याप्रकरणी तीन अज्ञात शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला असताना रविवारी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी २० ते २५ अज्ञात महिला शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : चासकमान कालव्यामधून पाणी सुरू असल्याने या ठिकाणी अधिकाऱ्यांचा पहारा सुरू आहे, तर करंदी येथील कोरेगाव भीमा धानोरे शाखा कालवा तसेच कालव्याच्या ठिकाणी आपटी पहारा सुरू असताना करंदी गावच्या हद्दीमध्ये चासकमानचे पाणी सुरू असताना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास चासकमानचे अधिकारी त्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी गेले होते. या वेळी येथील कालव्याच्या साखळी क्रमांक ६८/२०० या ठिकाणचे गेट महिला शेतकऱ्यांनी कुलूप व साखळी तोडून उघडले होते व पाणी चोरून घेतले होते. या वेळी चासकमानच्या अधिकाऱ्यांनी तेथे जात येथील काही कर्मचाऱ्यांसह पाणी वाया जाऊ नये, म्हणून येथील चारीचे गेट बंद करत असताना या २० ते २५ महिला त्या ठिकाणी आल्या व तुम्ही गेट बंद करायचे नाही, असे म्हणून चासकमान अधिकाऱ्यांना प्रतिबंध करू लागल्या. या वेळी चासकमानच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे व्हिडीओ रेकॉर्ड केले असून याबाबत शिक्रापूर येथील चासकमान पाटबंधारे शाखा क्र. दोनचे शाखाधिकारी रंगनाथ ज्ञानोबा भुजबळ यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी वीस ते पंचवीस अज्ञात महिला शेतकऱ्यांविरुद्ध शासकीय कामात अडथळा तसेच पाणीचोरीप्रकरणी गुन्हा दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे करीत आहेत.