शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

गाडीसह एका प्रवाशाचे अपहरण

By admin | Updated: December 3, 2014 02:56 IST

माटोबा तलाव (ता. दौंड) परिसरात तवेरा गाडीच्या चालकाला शस्त्राने मारहाण करुन गाडीसह एका प्रवाशाचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली.

दौंड : माटोबा तलाव (ता. दौंड) परिसरात तवेरा गाडीच्या चालकाला शस्त्राने मारहाण करुन गाडीसह एका प्रवाशाचे अपहरण करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी दिली. या प्रकरणी जबरी चोरी आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवार (दि. १) रोजी सकाळी १0 वाजता दौंड रेल्वे स्टेशन परिसरात उभ्या असलेल्या तवेरा गाडीजवळ (क्र. एम.एच. १२ सी.आर. ५४५३) चार प्रवाशी आले. यावेळी गाडीचा चालक प्रमोद सिपनकर (रा. दौंड) याला चारीही प्रवाशी म्हणाले , खुटबाव (ता. दौंड) येथील पोल्ट्री फार्मवर जायचे आहे. त्यांच्यात चर्चा होऊन गाडीचे भाडे ठरले. त्यानुसार हे चौघे गाडीत बसले . दरम्यान यवतकडे जाण्यासाठी अन्य एक दुसरा प्रवाशी बसला. गाडी लडकतवाडी मार्गे खुटबावला निघाली. त्यानंतर गाडी माटोबा तलावाच्या दिशेने गेली. यावेळी गाडी थांबविण्यात आली. थोड्यावेळाने गाडी सुरु झाली तेव्हा चालक प्रमोद याला चाकूचा धाक दाखवून मागच्या सिटावर ओढून त्याला सिटाखाली टाकले. त्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्याराने वार केला. चाकूचा धाक दाखवुन त्याचे हात पाय बांधून त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला गाडीतून खाली उतरुन दिले. तसेच गाडीत बसलेल्या अन्य एका प्रवाशासह तवेरा गाडीचे अपहरण करुन या चोरट्यांनी पोबारा केला.त्यानंतर प्रमोदने कसेबसे हाता पायाला आणि तोंडाला बांधलेले कापड बाजूला करून एका वस्तीजवळ जाऊन मदत मागीतली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला प्रमोदने घडलेली घटना सांगून यवत पोलीस स्टेशन पर्यंत सोडून देण्याची विनंती केली. दुचाकीस्वाराने प्रमोदला पोलीस स्टेशनाला नेल्यानंतर चौकशी करुन हा गुन्हा दौंड पोलीसांकडे वर्ग केला. (वार्ताहर)