शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
2
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
3
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
4
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
5
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
6
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
7
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
8
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
9
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
10
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
11
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
12
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
13
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
14
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
15
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
16
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
17
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
18
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
19
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स

‘हे गजवदन...’ गीत एक, स्वररंग अनेक!

By admin | Updated: August 19, 2016 06:02 IST

गायक, वादक, संगीतकार, रेकॉर्डिस्ट अशा संगीतक्षेत्रातील तब्बल ९१ मान्यवरांना बोलाच्या एकाच धाग्यात सुंदरपणे गुंफून संगीतकार सलील कुलकर्णी यांनी ‘हे गजवदन’ या व्हिडिओ

पुणे : गायक, वादक, संगीतकार, रेकॉर्डिस्ट अशा संगीतक्षेत्रातील तब्बल ९१ मान्यवरांना बोलाच्या एकाच धाग्यात सुंदरपणे गुंफून संगीतकार सलील कुलकर्णी यांनी ‘हे गजवदन’ या व्हिडिओ गीताची अभिनव कंठमालिका रसिकांसमोर पेश केली आहे. कलाकारांच्या उपस्थितीत गुरुवारी या गीताचे अनावरण झाले. आनंद आणि मांगल्याचे प्रतीक असलेल्या लाडक्या गणपती बाप्पाचे ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ हे आरतीचे बोल आणि आरती प्रभूंनी १९७०च्या दशकात ‘अजब न्याय वर्तुळाचा’ नाटकासाठी लिहिलेल्या नांदीच्या ओळी यांच्या मिलाफातून सलील कुलकर्णी यांनी स्वरबद्ध केलेली रचना म्हणजे ‘हे गजवदन वक्रतुंड महाकाय’ हे व्हिडिओ गीत. ते यू ट्यूबवर अपलोड केल्यानंतर त्याला अल्पावधीतच हजारो लाइक्स मिळण्यास सुरुवात झाली असून, मराठीमध्ये झालेल्या या पहिल्याच प्रयोगावर सांगीतिक वर्तुळातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आजवर संगीतकार सलील कुलकर्णी यांनी बालगीतांपासून प्रेमगीतापर्यंत आणि चित्रपटगीतांपासून अभंगापर्यंत विविध प्रकारच्या रचना रसिकांसमोर समर्थपणे सादर केल्या आहेत. आता यापुढचे पाऊल म्हणजे ही संगीताच्या विविध रंगांना एकत्र आणणारी रचना आणि त्याचे चित्रपटाच्या स्तरावर केले गेलेले चित्रीकरण याद्वारे केलेला एक अभिनव प्रयोग. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सादर झालेल्या या व्हिडिओ गीताच्या रूपातून एका मांगल्यदायी वातावरणनिर्मितीस आरंभ झाला आहे. गणेशोत्सवाच्या काळात मल्टिप्लेक्समध्ये या व्हिडीओ गिताचा अनुभव रसिकांना मिळणार आहे़ या व्हिडीओ गितात पियानो, गिटार, सतार, सरोदसुद्धा आहेत... कथ्थक नृत्यासाठी म्हटली जाणारी पढंत ही ऐकायला मिळणार आहे. पाश्चात्त्य ड्रम्सबरोबर पखवाज- मृदंगम्चा ठेकाही अनुभवता येईल. या गाण्याच्या माध्यमातून जुन्या-नव्या सांगीतिक परंपरांच्या मिलाफाचे दर्शनही घडेल. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या स्वरापासून सुरू होणाऱ्या या रचनेत आपल्याला शास्त्रीय संगीतातील शौनक अभिषेकी, संजीव अभ्यंकर, आनंद भाटे, राहुल देशपांडे, सावनी शेंडे, महेश काळे, मंजूषा पाटील, अनुराधा कुबेर ही मंडळी; तर भावसंगीत, चित्रपटसंगीतातील अवधूत गुप्ते, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, वैशाली सामंत तसेच ‘झी सा रे गा मा’चे विजेते गायक, लिट्ल चॅम्प्स तसेच गायिका-अभिनेत्री केतकी माटेगावकर, कवी संदीप खरे, विभावरी आपटे, मधुरा दातार, हृषीकेश रानडे हे भेटणार आहेत. गायकांप्रमाणेच, संगीतकार कौशल इनामदार, मिलिंद इंगळे, नीलेश मोहरीर, मिथिलेश पाटणकर, मिलिंद जोशी यांनीसुद्धा गाण्याला आपला स्वर दिला आहे. बालगायकांचासुद्धा व्हिडिओमध्ये या समावेश आहे. आजच्या पिढीच्या गायिका आनंदी जोशी, सावनी रवींद्र यांचाही सहभाग आहे आणि ज्यांच्याशिवाय कोणतेही गाणे घडूच शकत नाही अशी वादक मंडळीसुद्धा या गाण्यात गायन सादर करताना दिसणार आहेत. महाराष्ट्रातील काही नामवंत रेकॉर्डिस्ट प्रमोद चांदोरकर, विजय दयाळ, नितीन जोशी, अवधूत वाडकर इ. उत्कृष्ट साऊंड इंजिनिअरचा गायनातील सहभाग ही कोणत्याही गाण्यात प्रथमच घडलेली गोष्ट आहे. मराठी संगीतक्षेत्रातील एकूण ९१ मंडळी या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटणार आहेत. मोहित भिशीकर हे व्हिडिओचे निर्माते असून, समीर जोशी यांनी दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. संपादन साहिल तांडेल यांचे आहे. या गाण्याविषयी भावना व्यक्त करताना प्रसिध्द गायिका विभावरी आपटे म्हणाल्या, ‘‘जुन्या कलाकारांपासून नव्या पिढीपर्यंतचा मिलाफ गाण्यात अनुभवास मिळतो. विशेष म्हणजे, जे आमचे गाणे पुढे आणण्याचे काम करतात, ते रेकॉर्डिस्टदेखील यात सहभागी झाले आहेत, याचा अधिक आनंद आहे. लाईव्ह गाणे सादर करताना त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी लाखमोलाचे असते. गायिका प्राजक्ता रानडे म्हणाल्या, ‘‘स्वतंत्रपणे अनेक कार्यक्रम आम्ही केले; पण याचे वैशिष्ट म्हणजे एकच लाईन गायला असूनही आमच्यात कोणतीही स्पर्धा नव्हती. एका छान मूडमध्ये सर्व जण लाडक्या गणपतीबाप्पासाठी गायले आहेत. ’’कसबा गणपतीचे आशुतोष वैद्य म्हणाले, ‘‘कसबा गणपतीमध्ये डॉ. सलील कुलकर्णी यांचा नेहमी सहभाग असतो. चांदीच्या पालखीत विराजमान झालेल्या मानाच्या पहिल्या गणपतीला आणताना पालखीला खांदा देण्याची विनंती सलील यांनी केली होती. दोन वर्षांपूर्वी ही पालखी खांद्यावर उचलण्याचा मान त्यांना मिळाला. गणपतीला उचलून ‘मोरया-मोरया’ करताना अंगात जे व्हायब्रेशन येते, तसाच काहीसा अनुभव हा व्हिडिओ पाहून आला.’’(प्रतिनिधी)हा नुसता व्हिडिओ नसून एक मैत्रीचा प्रोजेक्ट आहे. जुन्या आणि नवीन कलाकारांचा मिलाफ यात पाहायला मिळेल. व्यावसायिक हेतूने एकही कलाकार सहभागी झालेला नाही. मुंबई आणि पुण्यात कलाकार एकत्रितरीत्या उपलब्ध झाले आणि हा मणिकांचन योग जुळून आला. हे गाणे चार मिनिटांचे असून, यू ट्यूबवर टाकल्यानंतर क्षणातच लाइक्स मिळण्यास सुरुवात झाली याचा मनापासून आनंद आहे. याचा आॅडिओ मिळेल का, अशी मागणी आता होऊ लागली आहे. लवकरच तो उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. - डॉ. सलील कुलकर्णी, संगीतकारएका श्रद्धेच्या, मग ती संगीत असो किंवा लाडका गणपती बाप्प्पा, शुद्ध भावनेने आम्ही कलाकार यात सहभागी झालो. कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन नव्हता, ही भावना आमच्यासाठी महत्त्वाची होती. - आनंद भाटे, युवा गायकया गाण्यात एक सकारात्मकता आढळून आली. सर्व कलाकारांचे व्हायब्रेशन गाण्यात एकत्र आले आणि एका चांगल्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला. - सावनी शेंडे, युवा गायिका