शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांच्या आठवणीत ‘तिचा’ विवाह!

By admin | Updated: April 22, 2017 03:30 IST

मागील महिन्यामध्ये दि. १२ मार्च रोजी शेतीचे कर्ज व अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले मुलीचे लग्न यामुळे तरडोलीनजीक पवारवाडी येथील आत्माराम ज्ञानदेव शेळके

मोरगाव : मागील महिन्यामध्ये दि. १२ मार्च रोजी शेतीचे कर्ज व अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले मुलीचे लग्न यामुळे तरडोलीनजीक पवारवाडी येथील आत्माराम ज्ञानदेव शेळके या शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यामुळे शेळके कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र बारामती येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने हा लग्नसोहळा पार करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवला असून तालुक्यातील इतर सामाजिक संस्थांसाठी एक वेगळा पायंडा निर्माण केला आहे. बारामती तालुक्यातील तरडोली येथील आत्महत्याग्रस्त आत्माराम शेळके यांची मुलगी मोनिका व पवारवाडी येथीलच अप्पासोा पवार यांचा मुलगा विकास यांचा विवाह पवारवाडी येथील सिद्धेश्वर मंदिरासमोर झाला. या लग्न सोहळ्यासाठी शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने मांडव, दिवाण संसारोपयोगी प्रत्येकी पाच पाच भांड्यांचा संच, पिण्याचे पाणी, पत्रावळी आदी खर्च लग्नासाठी केला आहे. लग्न दिमाखात पार पाडले. अगदी जेवणाचा खर्च व अन्न तयार करण्यासाठी आचारीही प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला होता. प्रतिष्ठानने केलेल्या या खर्चामुळे शेळके कुटुंबीयांच्या भावनांना बांध फुटला. शेळके यांच्या नातेवाईकांनीही कूलर, फ्रीज, सोफा आदी वस्तू मोनिकाच्या लग्नानिमित्त आंदन केल्या. समाजातील अशा संस्था पुढे आल्यास राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होणार नाही, असे मत मुलीचे चुलते रावसाहेब शेळके व मुलीची आई आनंदाबाई यांनी व्यक्त केले. लग्न सोहळ्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, शरयू फाउंडेशनच्या शर्मिला पवार, सनी देवकाते, तरडोलीच्या सरपंच गौरी शिंदे, उपसरपंच संजय भापकर, हनुमंत भापकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. लग्नानंतर शर्मिला पवार यांनी दहा हजार रुपयांची मदत शेळके परिवाराला केली. (वार्ताहर)...तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतीलआयुष्याचा साथीदार शोधल्यानंतर समाजातील तरुण मुलांनी लग्नात कुठलीही अपेक्षा न धरता हुंडा न घेता लग्न केल्यास बारामती तालुक्यातच नाही तर संपूर्ण राज्यात मुलीच्या लग्नासाठी शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबतील, असे विकास अप्पासाहेब पवार यांनी सांगितले.