शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

दीप्ती काळेच्या अटकेवरून पती लेफ्टनंट कमांडरांनी केली होती परराष्ट्रमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अ‍ॅड. दीप्ती काळे यांना पोलिसांनी मध्यरात्रीनंतर घरी जाऊन अटक केल्याप्रकरणी त्यांचे पती लेफ्टनंट कमांडर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अ‍ॅड. दीप्ती काळे यांना पोलिसांनी मध्यरात्रीनंतर घरी जाऊन अटक केल्याप्रकरणी त्यांचे पती लेफ्टनंट कमांडर श्रीवास्तन रामाणी (निवृत्त) यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ़ एस. जयशंकर यांच्याकडे तक्रार केली आहे़ त्यात त्यांनी दीप्ती काळे यांच्या जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली होती.

रामाणी हे कॅनडियन नागरिक असून सध्या ते मोठ्या मुलाकडे कॅनडा येथे वास्तव्याला आहेत. रामाणी हे इंडियन नेव्हीमध्ये लेफ्टनंट कमांडर होते. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांना पाठविलेल्या पत्रात रामाणी यांनी आपली पत्नी दीप्ती काळे ही लहान मुलासह पुण्याला राहत आहे. यापूर्वी दीप्ती काळे हिच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत आपण पुणे पोलीस आयुक्तांची २०१९ मध्ये भेट घेऊन पुरावे दिले होते. पोलिसांनी आता तिला अटक केली आहे. पोलीस कोठडीदरम्यान तिच्या जिवाला धोका आहे. आपले कोणी नातेवाईक या प्रसंगी पुण्यात नाही. सध्याच्या कोविडच्या काळात चेन्नईहून नातेवाईकांना पुण्यात येणे अशक्य आहे. माझ्याकडे काही पर्याय नसल्याने आपल्याशी पत्रव्यवहार करीत असल्याचे रामाणी यांनी या पत्रात म्हटले आहे. याबाबतची माहिती अ‍ॅड. तौसिफ शेख यांनी दिली.

दरम्यान, अ‍ॅड. दीप्ती काळे ही पोलीस संरक्षणात असल्याने तिच्या मृत्यूची नियमानुसार राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाईल.