शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

भाटनगरात हप्तेवसुली बंद; कारवाई सुरू

By admin | Updated: July 28, 2015 00:50 IST

एरवी भाटनगरकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांना आता भाटनगरकडे लक्ष केंद्रित करणे भाग पडले आहे. ‘लोकमत’ने १६ जुलैपासून हातभट्टी आणि अवैध दारूधंद्यांविरोधात जोरदार मोहीम

पिंपरी : एरवी भाटनगरकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांना आता भाटनगरकडे लक्ष केंद्रित करणे भाग पडले आहे. ‘लोकमत’ने १६ जुलैपासून हातभट्टी आणि अवैध दारूधंद्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेतली. कारवाई करून पोलीस निघून जाताच, भाटनगरमध्ये हातभट्ट्या लगेच सुरू व्हायच्या. पोलिसांची कारवाई केवळ फार्स ठरायची. आता मात्र पोलीस येथे हप्ता वसुलीसाठी नव्हे, तर कारवाईसाठी येत आहेत. लोकमतने पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची कारवाईची कार्यपद्धती चव्हाट्यावर आणली. त्यामुळे आता भाटनगरमध्ये हातभट्ट्या सुरू होणार नाहीत, याची खबरदारी म्हणून पोलीस रोजच फेरफटका मारू लागले आहेत. आढळून येणाऱ्यांवर कारवाईसुद्धा केली जात आहे. हातभट्टीचे आगार मानल्या जाणाऱ्या भाटनगरमधील दारूअड्डे कायमचे बंद करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. यापूर्वी पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कारवाई नावापुरती करायचे. कठोर कारवाईचे धोरण अवलंबले जात नव्हते. एकदा कारवाई केली की, कित्येक दिवस पोलीस त्या भागात फिरकत नव्हते. लोकमतने सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे पोलिसांना कारवाई करणे भाग पडले आहे. बारा दिवसांपासून पोलिसांनी भाटनगर परिसरातील हातभट्ट्या आणि अड्डे यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. घराघरांत शिरून पोलिसांनी दारू तयार करण्याचे साहित्य, तयार दारूचा साठा नष्ट केला. त्यानंतरही नेहमीची सवय लागलेल्या भाटनगरमधील काही रहिवाशांनी हातभट्टी तयार करून विकणे सुरू केले. पोलिसांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत काही जणांवर गुन्हे दाखल केले. यापूर्वी कारवाईनंतर काही पोलीस यायचे, ते हप्ते वसुलीसाठी. आता परिस्थिती बदलली आहे. पोलीस हप्ते वसुलीला नव्हे, तर कारवाईनंतरही कोणी हातभट्टी तयार करण्याचा, साठा करून विक्रीचा प्रयत्न करीत आहे का, हे पाहण्यासाठी ‘राऊंड’ मारू लागले आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हातभट्टीवाल्यांचे वांदे झाले आहेत. एखाद दुसरा दिवस वृत्तपत्रांत बातमी येईल, नावापुरती पोलीस कारवाई करतील, पुन्हा जैसे थे परिस्थिती असेल, हा हातभट्टीवाल्यांचा समज लोकमतने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे फोल ठरला आहे. कोणत्याही क्षणी पोलीस येतील, कारवाई करतील, अशी भीती त्यांना वाटू लागली आहे. पोलिसांनीही गांभीर्याने दखल घेऊन या भागाकडे लक्ष केंद्रित केल्याने कधी नव्हे एवढी अडचण हातभट्टी व्यावसायिकांपुढे निर्माण झाली आहे. सोसायट्यांमध्ये राहणारे रहिवाशी अवैध धंद्यांच्या विरोधात तक्रार करणे, समस्या तडीस जाईपर्यंत पाठपुरावा करण्याचे बहुधा टाळतात. कशाला कोणाचा विरोध ओढवून घ्यायचा, अशी त्यांची धारणा असते. लोकमतने अवैध धंद्यांविरोधात मोहीम हाती घेतल्यामुळे सोसायट्यांमधील नागरिकही तक्रार देण्यास पुढे येऊ लागले आहेत. रहाटणीतील सह्याद्री सहकारी गृहरचना संस्थेतील रहिवाशांनी त्यांच्या सोसायटीजवळ अनंत पार्कच्या प्रवेशद्वारावर असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानामुळे होणाऱ्या त्रासाची तक्रार पोलिसांना दिली आहे. मद्यविक्रीचा परवाना मिळविला असला, तरी या मद्यविक्री दुकानाला आजूबाजूच्या रहिवाशांनी कडाडून विरोध केला आहे. लोकवस्तीत असलेल्या या दुकानापुढे रोज रात्री मद्यपींचा अड्डा तयार होतो. महिलांना सायंकाळी सहानंतर घराबाहेर पडणे कठीण होते. अनेकदा पोलिसांकडे तक्रार दिली. परंतु, काहीच उपयोग झाला नाही. त्यांनी त्यांची व्यथा लोकमतकडे मांडली. (प्रतिनिधी)हातभट्टीचे रसायन नष्टपोलिसांनी रविवारी भाटनगर येथे सुनीता राजू मिनेकर यांच्या घरातून हातभट्टी तयार करण्याचे ७० लिटर रसायन जप्त केले. १२५० रुपयांचा गावठी दारूचा माल जप्त केला. त्यांच्यावर मुंबई पोलीस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भाटनगर भागात रोजची गस्त सुरू केली आहे. कोणीही पुन्हा हातभट्ट्या सुरू करू नयेत, असे आवाहन केले आहे. आवाहन केल्यानंतरही या भागात छुप्या पद्धतीने दारू तयार करण्याचा, साठा करून विक्रीचा प्रयत्न काही जण करीत होते. त्यांना पोलिसांनी समज दिली आहे. कठोर भूमिका घेऊन कारवाई सुरूच ठेवल्याने येथील परिस्थिती बदलेल, असा विश्वास पोलीस व्यक्त करू लागले आहेत.